कोरोना काळात मृत्यू मुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना दोन लाखांची मदत कल्याण डोंबिवली कर्मचारी पतसंस्थेचा पुढाकार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने कोरोना काळात मृत्यू मुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विधवा महिला वारसांना दोन लाख रुपयांचे धनादेश कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यलेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि माजी महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. पतसंस्थेची अकरावी सर्वसाधारण सभा बुधवारी महापालिका भवन स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा संपन्न झाली. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाशी लढा दिला. राज्य शासनाने कोरोनामध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकारी किंव्हा कर्मचारी हे मृत्युमुखी पडल्यास पन्नास लाख रुपये कुटुंबातील वारसांना दिले जातील असा आदेश जारी करण्यात आला होता. मात्र आदेशाचे पालन झाले नसल्याचे चित्र दिसत आहे.माजी महापौर रमेश जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन राज्य शासन कर्मचाऱ्यांना मदत देईल तेव्हा देईल परंतु आपल्या पालिकेच्या वतीने कोरोना कार्यकाळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांची मदत करा असे सांगितले होते. महापालिकेतील कर्मचारी त्यांच्या वारसांना मिळणारी रक्कम पेन्शन, प्राविडंड फंड, तथा वारसांना मिळणारी नोकरी अद्याप मिळाली नाही. तर काही कर्मचाऱ्यांचे बिले मंजुरी करिता आरोग्य विभागाकडे असून अनेक कारणे सांगून फाईली धुळ खात पडून आहेत त्यावर लवकर निर्णय घ्यावा असे माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितले.पतसंस्थेच्या वतीने जे कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत त्यांचा गृप विमा काढला असून पतसंस्थेने भीमराव साळवे आणि मंगेश जाधव यांच्या परिवारास दोन लाख रुपयांचे धनादेश दिले. मागील वर्षी १ लाख रुपये देण्यात आले होते. त्यामध्ये यावर्षी वाढ करून २ लाख रुपयांची मदत करता आली. याप्रसंगी मंगल भीमराव साळवे यांनी पतसंस्थेने केलेल्या दोन लाखाच्या मदतीतून १० हजार रुपये संस्थेच्या कल्याण निधीसाठी खजिनदार कल्पना खरात यांच्याकडे धनादेश सुपूर्द करून संस्थेचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments