युरो कार्सची केका सोबत भागीदारी आपल्या एचआर सेवांमध्ये करणार अमुलाग्र बदल ~
मुंबई, १६ सप्टेंबर २०२१  : युरो कार्स या मोबिलिटी सोल्यूशन्स प्रोव्हायडरने एचआरएमएस सेगमेंट लीडर केका बरोबर भागीदारी केल्याने त्यांची एचआर प्रक्रिया प्रभावीपणे स्वयंचलित आणि सुव्यवस्थित झाली आहे. एकूण उत्पादकतेत वाढ करण्यात यशाचे द्योतक म्हणून युरो कार्स या निर्णयाकडे पाहत आहे.        युरो कार हा भारताचा मोबिलिटी सोल्यूशन्समधील अग्रगण्य व्यवसाय आहे. केकासोबत हातमिळवणी करण्यापूर्वी, एचआर संबंधीची कामे रोजच्या शिरस्त्याप्रमाणे स्वतःच कंपनी हातळत असत. या सेवा स्वंयचलित नसल्याने एचआरशी संबंधित अडचणी उद्भवल्या. ज्यात उपस्थिती नोंद हातळण्याच्या सदोष पद्धतीचा समावेश होता. आता स्वंयचलित पद्धतीने या सेवा केका त्यांना मदत करत आहे.            केकाने आपल्या कार्यक्षम दृष्टिकोनामुळे, युरो कार्सच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण परिणाम मिळवले. यामध्ये सेल्फी अटेंडन्स, जीपीएस ट्रॅकिंग, आणि मोबाइलच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद यांचा समावेश आहे. ज्यामुळे कर्मचा-यांची उपस्थितीवरील लक्ष ठेवण्याची अचूकता ९५ टक्क्यांनी वाढली आहे.          युरो कार्सचे संचालक मोहित मंगल यांनी सांगितले की, "केका हे आमच्या कंपनीसाठी परिवर्तनवादी साधन आहे. ग्राहकांना आनंदाची पर्वणी देणा-या एकूण सर्व सेवा पातळ्यांवर खरे उतरलेले सॉफ्टवेअर ओळखल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.             निर्दोष आणि परिपूर्ण सॉफ्टवेअर, ऑनबोर्डिंग प्रक्रियेत सुलभ अथवा विक्रीनंतरही त्यांची तत्पर सेवेचा यात अंतर्भाव आहे. केका दररोज अद्ययावत होत असताना, मला नजीकच्या भविष्यात दुस-या एचआरएमएस सेवा प्रदान करणा-याची गरज वाटत नाही. कारण प्रत्येक कंपनीसाठी केका ही उत्कृष्ट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे."

Post a Comment

0 Comments