कल्याण - डोंबिवलीत २६, २८० गौरी गणपतीचे भक्ति भावाने विसर्जन

 डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवलीतील एकूण ६८ विसर्जन स्थळांवर श्री गणेशाचे व गौरींचे विसर्जन शांततामय वातावरणात पार पडले. महापालिका क्षेत्रात काल एकुण २६,२८० श्री गणेश मुर्तींचे विसर्जन  विविध विसर्जन स्थळांवर करण्यात आले.              त्यापैकी 'विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत 'अ'प्रभागात १९, ब प्रभागात ४५१, 'क' प्रभागात १४२७, जे प्रभागात ३४, 'ड' प्रभागात ४० , 'फ' प्रभागात ४ , 'ग' प्रभागात ४६, 'ह'प्रभागात २५, 'आय' प्रभागात २५ आणि 'ई'प्रभागात ४४ अशा एकुण २११५ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
              दिड दिवसाच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे २५ मेट्रिक टन  व गौरी गणपतीच्या दिवशी सुमारे ३५ मेट्रिक टन असे सुमारे ६० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.  निर्माल्य महापालिकेच्या उंबर्डे येथील खत प्रकल्पाकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Post a Comment

0 Comments