Header AD

ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेची पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

 

■ठाणेकरांसह महापालिका प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी मानले आभार...


ठाणे , प्रतिनिधी  : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या श्रीगणेश विसर्जन व्यवस्थेची राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्यासमवेत प्रत्यक्षस्थळी जावून पाहणी केली. 



           यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने श्रीगणेश विसर्जनासाठी अत्यंत चोख व्यवस्था केल्याबद्दल संपूर्ण प्रशासनाचे तसेच ठाणेकरांनी शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल ना. एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.



            श्री गणेश विसर्जनाच्या दहाव्या दिवशी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सर्व विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी खासदार राजन विचारे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


     

              दरवर्षीप्रमाणे श्री गणेश मुर्तींचे विधिवत विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने एकूण ७ विसर्जन महाघाट, १३ कृत्रीम तलाव तर ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी २० ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली होती. 



           तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेला देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या या चोख व्यवस्थेचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कौतुक करत सर्वांचे आभार मानले.


     

           अनंत चतुर्थी दिवशी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोलशेत विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर, कोपरी, उपवन तलाव, रायलादेवी व मासुंदा तलाव येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.


       यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सर्व ठाणेकरांचे आभार मानले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विसर्जनस्थळी उभारण्यात आलेल्या अँन्टीजन चाचणी केंद्राची देखील पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून यंत्रणेचा आढावा घेतला. 


       

            दरम्यान गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगर पालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सर्व विसर्जन महाघाट व कृत्रिम तलाव येथे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे रक्षण करण्यासाठी "हरित शपथ" घेण्यात आली.                

ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेची पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेची पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी Reviewed by News1 Marathi on September 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads