वाहतूक कोंडीवरुन एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिसात वाद
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीत नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे चालकांमध्ये वाद होतो. मात्र कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात थेट एसटी चालक आणि वाहतूक पोलीस आपसात भिडले. या दोघांच्या वादामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक कोंडी असल्याने वाहतूक पोलिसांकडून बस चालकाला बस थांबवण्यास सांगण्यात आले होते. या शुल्लक कारणावरुन हा वाद निर्माण झाला. पुढील सर्कलला ट्रॅफिक असल्याने एसटी चालकाला थांबण्यास सांगितले.आज कल्याणमध्ये थेट एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिस आमने सामने होते. शिवाजी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होती. शिवाजी चौकात कर्तव्य बजावित असलेल्या वाहतूक पोलिसांनी पुढच्या सर्कलला जास्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण एसटी चालकास बस थांबवा नंतर पुढे जा असे सांगितले. या मुद्यावरुन बस चालकमहिला कंडक्टर आणि वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. या वादामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बसच्या मागे वाहनांची रांग लागली होती.

Post a Comment

0 Comments