डोंबिवलीत क्रीडा शिक्षक व खेळाडूंचा सन्मान

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन व प्रगती महाविद्यालयडोंबिवली यांच्या सौजन्याने सोमवारी  खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला.
  गतवर्षी कोविड ने उद्भवलेल्या बिकट परिस्थिती मुळे हा समारंभ करता आला नाही. यंदा हा समारंभ उत्साहात पार पडला परंतु मर्यादित उपस्थितीत व कोवीड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत राष्ट्रीय क्रीडा दिन (२९ ऑगस्ट) व शिक्षक दिनाचे  (५ सप्टेंबर औचित्य साधत विविध क्रीडा प्रकारात  आंतरराष्ट्रीयराष्ट्रीयराज्यस्तरावर स्पृहणीय यश संपादन केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील  खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
खेळाडूंना यशोमार्गावर घेऊन जाणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा गौरवही प्रतिवर्षी केला जातो. यंदाही कृष्णा बनकर ( विद्यानिकेतन) व सुरेश बोरसे ( सरस्वती विद्यालय) यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभास माजी आमदार व ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील उपस्थित होते. "खेळाडूंनी नेहमी सकारात्मकता अंगी बाणवली पाहिजे म्हणजे परमोच्च यश प्राप्त करता येते." असा मोलाचा सल्ला जगन्नाथ पाटील यांनी दिला.
रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनोहर वारके यांनी सांगितले की "प्रत्येक विद्यार्थ्याने एकतरी खेळ शास्त्रशुद्ध शिकला पाहिजे व खेळलाही पाहिजे. शारिरीक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचा हाच योग्य मार्ग आहे." याच समारंभात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन च्या नेशन बिल्डर पुरस्कार प्रकल्प अंतर्गत डोंबिवली मधील ५ शिक्षकांना गौरविण्यात आले. 

वैशाली जाधव (सहा.शिक्षिकामहात्मा गांधी विद्यालय)अश्विनी माळी (शिक्षिकारोटरी स्कूल फॉर डेफ)विजया निरभवणे (मुख्याध्यापिकाटिळकनगर बाल विद्यामंदिर)सुप्रिया कुलकर्णी (शिक्षिकाअस्तित्त्व) आणि सुधाकर नगिने (सहा.शिक्षक,प्रकाश विद्यालय) हे रोटरीच्या मानाच्या 'नेशन बिल्डरपुरस्काराचे यंदाचे मानकरी होते.

Post a Comment

0 Comments