रोटरी क्लब ऑफ ठाणे मीडटाऊन व डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालक व पोलीस कर्मचारी यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...


ठाणे, प्रतिनिधी  :  गोरगरीब रिक्षाचालक, पोलीस कर्मचारी हे नेहमीच आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. अशा वंचितांना आरोग्यसेवा मिळावी या हेतूने  रोटरी क्लब ठाणे, मीडटाऊन  व डॉ.राजेश मढवी फाऊंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठाणे स्टेशन येथे संपन्न झाले.           सदर उपक्रमात ब्लड शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या. तसेच ठाणे रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोफत मास्कही वाटण्यात आले. सदर कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले ,ज्येष्ठ पत्रकार ठाणे वैभव संपादक मिलिंद बल्लाळ,  रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत, सीए केळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे आयोजक रोटरीचे अध्यक्ष नितीन केळकर व समाजसेवक डॉ.राजेश मढवी यांनी शतशः आभार प्रकट केले.

Post a Comment

0 Comments