समाजसेवक दिनेश तिवारी यांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात प्रवेश
मुंबई दि. 28 :-  घाटकोपर मधील समाजसेवक आणि विकासक दिनेश तिवारी यांनी केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बांद्रा संविधान निवासस्थानी  भेट घेऊन  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षात आज जाहीर प्रवेश केला. या वेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; हरिहर यादव; राम तांबे; घनश्याम चिरणकार आदी मान्यवर उपस्थित होते.                रिपब्लिकन पक्ष सर्व समाज घटकांसाठी काम करीत असून उत्तर भारतीय आणि परप्रांतीयांना मुंबईत न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर रिपब्लिकन नेतृत्व ना. रामदास आठवले यांचे राहिलेले आहे. त्यामुळेच आपण केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील   रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रबेश करीत असल्याचे दिनेश तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments