भाजपा उत्तर भारतीय मोर्च्याच्या वतीने वृद्धाश्रमात फळे वाटप

 डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजप डोंबिवली पूर्व उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धा फळे वाटप करण्यात आले.         कल्याण जिल्हा सचिव रविसिंह ठाकूर, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी,उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली शहर अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राम्हण महासभा उपाध्यक्ष तथा द नेशनल सिनियर वर्कर युनियन उपाध्यक्ष पंडित शिवम शुक्ला,उपाध्यक्ष श्याम यादव, महासचिव शशिकांत सिंह, महिला मोर्चा अध्यक्ष सुरेखा पांडे, यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.          यावेळी आमदार चव्हाण यांना दीर्घायुषी मिळो,त्यांचे राजकीय कारकीर्द अधिकाधिक फुलो अशा आशीर्वाद ज्येष्ठ नागरिकांनी दिला.तर शुक्ला यांनी आमदार चव्हाण  हे नेहमीच समाजकार्य करत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments