भिवंडीतील स्मित वृद्धा श्रमात थरथरत्या हातानी साकारली गणेश मूर्ती


■आरती शर्मा यांनी दिले आजी आजोबांना गणेश मूर्ती साकारण्याचे धडे...


भिवंडी दि 9 (प्रतिनिधी ) गतिमान यांत्रिक आधुनिक युग नव्याने रूढ होत आहे  वन वुमन वन किचन असलेली जीवनपद्धती या परिणामांमुळे या काळात पारंपारिक एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लोप पावत विभक्त कुटुंबव्यवस्था वेगाने रूढ होत आहे.           रोजच्या धकाधकीच्या युगात विभक्त कुटुंबातील व्यक्तीचे घरातील वडीलधारया  मंडळींकडे आरोग्याकडे  साहजिकच सहजच दुर्लक्ष होते. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात ज्यांनी कर्तृत्व गाजवले व आपल्या मुलांसाठी आयुष्यभर राब राब खस्ता खाल्ल्या अशी वयोवृद्ध आर्थिक अडचणी व त्यांचे आरोग्य   या कारणामुळे हि मंडळी घरात दूर वृद्धाश्रमात एकाकी पडू लागली आहेत.         अशा ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळात गणेश उत्सव व्हावा  या माणुसकीच्या दृष्टिकोनातून बेघरगरीबअपंग आणि मानसिकदृष्ट्या आजारी वृद्धाना संभाळनाऱ्या स्मित वृद्धाश्रमात  आजी-आजोबांना पर्यावरण संवर्धनाची संकल्पना घेवून स्मित फौंडेशन व कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणपती मूर्ती मेकिंग कार्यशाळेचे आयोजन ८ सप्टेंबर  रोजी संजीवनी कॉम्प्लेक्स रेतीबंदर रोडकाल्हेर भिवंडी येथे करण्यात आले         कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली  . प्रदूषण विरहित व नैसर्गिक विसर्जनाची  सुरवात व्हावी यासाठी  मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वय वर्षे ७० पासून ते ९६ वर्ष वृद्धांनी गणेशमूर्ती साकारली. ८९ वृद्धांनी स्वतःच्या हातांनी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र या कार्यशाळेत घेतले आहे.

Post a Comment

0 Comments