कोपर पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यां समोरच एकनाथ शिंदे - रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : डोंबिवलीतील कोपर पुलासह इतर विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात आज मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. कल्याण-डोंबिवली शहराशी आपलं विशेष नातं आहे. त्यामुळे या शहरासाठी ४७२ कोटी रुपयांचा निधी द्या. तसे आदेशच एकनाथ शिंदे साहेबांनी द्याअसं रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. फक्त ४७२ कोटींवर अडून बसू नका. एकाच भागासाठी सर्व निधी खर्च करता येणार नाही. सर्वसमावेशक काम करावं लागेलअसा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. चव्हाणांच्या या हल्लाबोलला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चांगलेच प्रतिउत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, मी डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबूगिरीचा प्रचंड राग आहे. लोकांच्या घरची भांडी घासू नका. आमचा त्यालाही पाठींबा होता. हे सर्व बाबू पुन्हा तेच करत आहेत. काही अधिकारी कशा पद्धतीने वागत आहेत. आपण तसे करणार नाही.गाय वासरू मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठशी खंबीरपणे उभे राहू नका. आपण हिंदुत्वाचा धागा पकडून चाललोय. तुमच्या आमच्या मनात असणारे हिंदुत्व कायम आहे. राज्यात कत्तलखाना नूतनीकरणासाठी पैसे दिले जात आहेत. वेद पाठशाळेचे निधी मंजूर करूनही पैसे दिले जात नाहीतअसं सांगतानाच सर्व भगात रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना भरपूर निधी दिला. या शहराशी आपले नाते आहे. या नात्यासाठी आम्ही आपला आदर करतो. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी 472 कोटी रुपये द्याएकनाथ शिंदे साहेबांना सांगाअसं आवाहन चव्हाण यांनी केलं.डोंबिवलीवर प्रेम कराकामे सुरू करा. कल्याणमधील नैसर्गिक प्रवाह बंद आहेत. नितीन गडकरी साहेबांना फोन करून सांगा. कल्याण शिळ रोडचे तुकडा तुकडा काम सुरू आहे. ही टीका नाहीयेही व्यथा आहे. या सर्वांवर तुम्हीच लक्ष दिले पाहिजे. वेगळे विषय सांगता येऊ शकतात. आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला नाहीअसं चव्हाण म्हणाले. आम्ही लोकसभेत युतीचा धर्म पाळला. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वैर नाही. विकास कामांसाठी आम्हला पैसे हवेत. ४७२ कोटी रुपये द्या. रस्ते डीपीआर तयार असेल तर मेट्रोग्रोथ सेंटर उभे राहिले पाहिजे. राजकारण म्हणून हे आम्ही मांडत नाही. हवं तर श्रेय तुम्ही घ्या. पण ही कामं करा. युतीतील कार्यकर्ता म्हणून तुम्ही आमची व्यथा जाणून घ्याअसं सांगातनाच आयुक्त चांगले काम करत आहेत. कोरोना काळात प्रत्येकाला कचरा कर लावू नका सांगितलेतरीही त्यांन कर लावलाअसा टोला त्यांनी लगावला.चव्हाण यांच्या या लांबलचक भाषणानंतर नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. डोंबिवलीकरांसाठी मोठा उपक्रम आहे. आपण लोकोपयोगी काम करतो तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवतो. एकाच भागासाठी ४७२ कोटीचा अट्टाहास न करता सर्व शहारासाठी उपयोग झाला पाहिजे. अडचणी असतील तेव्हा बोलू शकतो. पण चांगल्या कार्यक्रमात अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीअसा चिमटा शिंदे यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशाप्रमाणे फडणवीस सरकारच्या काळात घनकचरा उपविधी कर लागू करण्यात आला. राजकरण करायचे तर सगळे करू शकतात. घोषणा तुमच्यापेक्षा दहा पटीने आम्ही देऊ. मात्र जे करतो ते लोकांसाठीजनतेचा पैसे जनतेच्या कामासाठी वापरतो. लढाई करायची असेल तर कोव्हिड विरुद्ध केली पाहिजे. श्रेय वादाची लढाई शिवसेनेने केली नाही. एखाद्या विशिष्ट भागासाठी काम न करता सर्वसमावेशक असलं पाहिजेअसंही शिंदे म्हणाले. ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्या गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलो तर समस्या निर्माण होतील. गुन्हेगारांना कायद्याची भिती असली पाहिजेअसंही त्यांनी सांगितलं.डोंबिवलीतील लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही झाली. या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे कार्यक्रम उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्टेजवरील बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यामुळे चव्हाण स्टेजवर बसण्यास तयार नव्हते. उभे राहूनच हा कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. माझ्याकडून काही चूक होणार नाही. तुमच्याकडून जे झाले आहे ते लक्षात ठेवा. आम्ही मराठा आहोत हिशोब इकडेच चुकता करणारअशी शाब्दिक चमकमक यावेळी उडाली.विविध विकास कामांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा सुरू होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या असंख्य कार्याकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम स्थळी दाखल झाले. भाजप कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे सभागृहातील वातावरणच बदलून गेले. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करून भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला.


Post a Comment

0 Comments