पाचव्या दिवशीही विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकड़े भाविकांचा ओघ


■शहरातील १४,१२३ श्रीगणेशमुर्तींसह ९६४ गौरींचे भावपूर्ण विसर्जन , ३६६८ नागरिकांनी केले ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे विसर्जन 


ठाणे , प्रतिनिधी  : श्री गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १४,१२३ गणेशमुर्तींसह ९६४ गौरींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे व गौरीचे विसर्जन केले. 



          तसेच महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ६०० गणेश मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले.तर पाचव्या दिवशी ३६६८ नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचे विसर्जन केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.


        

          दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.



           तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



       यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले.  यावर्षी पाचव्या दिवशी १४,१२३ घरगुती गणेशमुर्ती, ९६४ गौरी, ८७ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच ६०० स्विकृत मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.



        शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी १९३६ घरगुती गणेश मुर्तींचे व २६५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात ७१३ घरगुती गणेश मुर्तींचे, १७ गौरींचे व २ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 



        आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये ४९० गणेश मुर्तींचे व ५३ गौरी, रेवाळे कृत्रिम तलाव येथे ५८० घरगुती गणेश मुर्ती, ३ सार्वजिनक गणेश मुर्ती व ३७ गौरी, मुल्लाबाग येथे ६५५ घरगुती गणेश मुर्ती, ३ सार्वजनिक गणेश मुर्ती व ३२ गौरी, खिड़काळी तलाव येथे ११३ घरगुती गणेश मुर्ती व ३ गौरी, शंकर मंदीर तलाव येथे २१६ घरगुती गणेश मुर्ती, ७ सार्वजिनक गणेश मुर्ती व १७  गौरी, उपवन तलाव येथे १८०१ घरगुती गणेश मुर्ती, ७ सार्वजिनक गणेश मुर्ती व १७ गौरींचे विसर्जन करण्यात आले.



       पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट  येथे ७११ घरगुती गणेश मुर्ती, ३० सार्वजनिक गणेश मुर्ती , ६६  गौरीं व ६०० स्वीकृत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे ३४२ घरगुती गणेश मूर्ती, २ सार्वजनिक गणेश मुर्ती व १४ गौरी तसेच गायमुख घाट २ येथे ८३ घरगुती गणेश मूर्ती व ५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे ५२४ घरगुती गणेश मुर्ती, २ सार्वजिनक गणेश मुर्ती व ९२ गौरींचे विसर्जन करण्यात आले.



         तर रायलादेवी घाट १ येथे १५४० घरगुती गणेश मुर्ती व १०४ गौरी, रायलादेवी घाट २ येथे ७६९ घरगुती गणेश मुर्ती व ४० गौरी, कोलशेत घाट १ व २ येथे ११२० घरगुती गणेश मुर्ती, १३ सार्वजनिक गणेश मुर्ती व १०५ गौरी, आत्माराम बालाजी घाट येथे ९६ घरगुती गणेश मूर्ती व २ गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे ७८३ घरगुती गणेश मुर्ती, १३ सार्वजिनक गणेश मुर्ती व २८ गौरींचे विसर्जन करण्यात आले.

       

   

          ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत पाचव्या दिवशी ३६६८ नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले.


      

          दरम्यान राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.यासोबतच महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. 



        यामध्ये स्वयंसेवक, महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या सहकार्याबद्दल देखील महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments