डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात भाजपचे ठिय्या आंदोलन महासभेत चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप

  डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिकेत प्रशासकीय राजवट असली तरी नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची एकूण परिस्थिती दिसून येत आहे.डोंबिवलीतील २० प्रभागात फक्त एकच मलनिस्सारण सयंत्र असून शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले आहे असा खोटा अहवाल पाच वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने महासभेत सादर केला होता असा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला आहे.       नागरिकांच्या सतत तक्रारी येत असल्याने अखेर बुधवारी भाजपच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील मलनि: स्सारण , जल:निस्सारण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.उपअभियंता लीलाधर नारखेडे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याबरोबर उद्या चर्चा होईल असे आश्वासन मिळण्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्या आंदोलन मागे घेतले.

   


        भाजपचे निलेश म्हात्रे, राजन आभाळे, मुकुंद पेढणेकर, डोंबिवली युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, विभाग प्रमुख अमित कासार आदींनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीतील ड्रेनेज व्यवस्था पूर्ण झाल्याचा अहवाल महासभेत यापूर्वीच अहवाल सादर केला होता.मात्र वास्तविक हा अहवाल खोटा असून ड्रेनेज व्यवस्था पूर्ण झालेली नाही.या अहवालामुळे मलनिस्सारण सयंत्र कमी पडले असल्याने नागरिकांच्या तक्रारी आल्या.

           यावेळी निलेश म्हात्रे म्हणालेशहरात तीन प्रभागक्षेत्रात मलनिस्सारणच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्रत्येक प्रभागक्षेत्रात १०  च्या वर वॉर्ड असून एकेक वॉर्डमध्ये शंभर पेक्षा जास्त इमारती आहेत. त्यामुळे सुमारे १०  हजार इमारती व चाळ अशा वस्तीमध्ये फक्त एक मलनि:स्सारण मशीन असल्याने शहराची स्वच्छता कशी होणार असा प्रतिप्रश्न भाजपचे माजी नगरसेवक विचारात आहेत. मलनि:स्सारणसाठी अमृत योजना माध्यमातून काम चोख होईल असे सांगण्यात आले होते.

              परंतु ते अद्याप कागदावर असल्याने ते कधी पूर्ण होईल असे विचारून याबाबत पालिका अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोप विसू पेडणेकर यांनी केला.  याबाबत पालिकेचे उप अभियंता लीलाधर नारखेडे यांनी आपल्या मागण्या मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवू आणि यातून मार्ग निघेल असे सांगितल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र या आंदोलनाची कोणतीच माहिती पसलिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नसल्याने विभागीय कार्यालयात भाजपाच्या माजी नगरसेवकांनी पालिका विरोधात घोषणा देते कार्यालय दणकून सोडले होते.

Post a Comment

0 Comments