राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट


यंत्रणांनी आणि नागरिकांनी दक्ष राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...


ठाणे, दि.26 (जिमाका) : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.              प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 24 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत कोकण विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने २८ सप्टेंबर रोजी किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे .             नागरिकांनी अधिक काळजी घेतानाच नदीकाठच्या तसेच किनारपट्टीवरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. याकाळात मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments