कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय, कचरा समस्या तसेच रस्त्यातील खड्डे आदी विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
यावेळी पालिकेच्या रुक्मिणी बाई रूग्णालयामध्ये काही बदलांविषयी त्याचबरोबर रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग असून कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयावर चर्चा करत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील तसेच द्वारली भाल नेवाळी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. यावर लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगत येत्या काही दिवसात सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
कल्याण पश्चिमेतील रुक्मिणी बाई रुग्णालयात गोर गरीबांसाठी पँथालाँजी, सिटी स्कॅन, सोनाग्राफी, एक्सरे सुविधावरभर देण्यात यावा. तसेच वसंत व्हॅली सुतिकागुहात नवजात बालकांना आवश्यकता भासल्यास काच पेटीची सुविधा उपलब्ध करणे, रस्त्यावरती कचऱ्याच्या समस्या व कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांचे विषयावर चर्चा करीत शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
आयुक्तांनी कचऱ्याच्या समस्या बाबत प्रशासन कारवाई करीत असुन प्रश्न मार्गी लागेल, तसेच गोर गरीबाच्या आरोग्य सुविधा कशा वाढविता येतील यादुष्टीने काम करणार आहोत, पाऊस असल्याने खड्डे भरण्याच्या कामाला गती मिळत नव्हती ऊन पडण्यास सुरवात झाली असुन रस्त्यात्यातील खड्डे प्रश्न देखील मार्गी लागेल असे आयुक्त डाँ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले असल्याचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अरविंद मोरे, जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, महेश गायकवाड, अरविंद पोटे, नगरसेवक मोहन उगले, विद्याधर भोईर, सुनील वायले, महिला आघाडी प्रमुख विजया पोटे आदि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments