खोट्या तक्रारींमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर खवा व्यापारी अडचणीत


■पैशांसाठी व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करण्याची संघटनेची मागणी...कल्याण शिव-भीम खवा व्यापारी चालक मालक कामगार संघटनेने घेतली पोलीस उपायुक्तांची भेट...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  खोट्या तक्रारींमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर खवा व्यापारी अडचणीत आले असून  पैशांसाठी व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेनी केली आहे.  याबाबत कल्याण शिव-भीम खवा व्यापारी चालक मालक कामगार संघटनेचे संस्थापक तथा शिवसेना नेते अरविंद मोरेरिपाई उपाध्यक्ष तसेच संघटनेचे अध्यक्ष सागर पगारे, संघटनेचे सचिव  जयदीप सानप, राजा जाधव सहित इतर पदाधिकारी यांनी संघटनेच्या वतीने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.भारतीय हिंदू पारंपरिक सण रक्षा बंधन गणेशोत्सवदसरादिवाळीला  विकली जाणारी पारंपरिक मिठाई दुग्धजन्य खवामावास्पेशलबर्फीमिल्क इतर मिठाई वर पोलीस काही बोगस पत्रकारब्लॅक मेलर कार्यकर्तेखंडणी खोर मिळून व्यापारी यांचा माल गाडी अडून ठेवतात आणि हा माल नकली आहे, याला मंजुरी नाही पक्के बिल दाखवा, गाडीमाल जमाकामगारव्यापारी यांना पोलीस ठाणे येथे जमा करा. कोर्ट मधून जमीन करा हे सर्व नसेल करायचे तर मग आम्हाला पैसे द्या असे प्रकार घडत आहेत.या अडवणुकी दरम्यान व्यापारी आपले सर्व सँपल पास बाबतचे कागद पत्र दाखवतात,  सर्व काही कायदेशीर असल्याचे पेपर दाखवतात, अन्न औषध प्रशासन यांना बोलवण्यास विनंती करतात, संघटनेचे ओळख पत्र प्रमाण पत्र दाखवतात तरी त्याला कोणतेही सहकार्य न करता अडवणूक करून त्याचा वेळ वाया घालून त्याचा व्यवसाय खराब काही बोगस पत्रकार, खंडणीखोर सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला हाताशी धरून करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.तसेच नामांकित चॉकलेट कंपनी सिने कलाकारांसोबत जाहिरात करून चॉकलेट विकण्या करिता काही चुकीच्या हेतूने एकच जुना व्हिडिओ दाखवून नकली खवा मावा पासून सावधान रहा सांगतात. यामुळे घाबरून ग्राहक पारंपरिक मिठाई न खाता महागडे चॉकलेट विकत घेतात. यामुळे नागरिकांसह, मिठाई व्यावसायीक, दुध उत्पादक शेतकरी यांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान कोणालाही बनावटी मिठाई आढळल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही त्यांवर कारवाई करू आणि व्यापारी कामगार यांना कोणीही व्यवसायिक अडवणूक करीत असल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही सहकार्य करू तसेच सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन संघटचे सचिव जयदीप सानप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments