त्या अधिकाऱ्यां वरील कारवाई चुकीची – संदीप पाटील


■अशा प्रकारच्या कारवाई मुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्ची करण..


कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील दावडी गाव येथील डीपी रस्त्यामध्ये येणारी ६ मजली इमारत नुकतीच केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. हि कारवाई केल्याने संबंधित विकासकाने त्या अधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचे आरोप केले. या आरोपांनंतर केडीएमसी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बदली केली आहे. अशा कर्तबगार अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई हि चुकीची असून यामुळे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे मत या इमारतीचे तक्रारदार आणि वास्तुविशारद संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.       कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये करण्यात आला आहे. मात्र या शहरांना स्मार्ट बनवितांना डीपी रस्त्यांवर अनेक इमारतींचे अतिक्रमण झालेले आहे. या इमारती शहराच्या विकासात अडथळा ठरत आहेत. या इमारतींची संख्या सुमारे ३०० च्या आसपास असल्याची माहिती वास्तुविशारद संदीप पाटील यांनी दिली आहे. अशाच प्रकारची ६ मजली इमारत हि दावडी येथील डीपी रस्त्यामध्ये येत होती. याबाबत पाटील यांनी तक्रार केल्यानंतर या इमारतीवर कारवाई करत हि इमारत निष्कासित करण्यात आली.या कारवाई नंतर संबंधित विकासकाने या अधिकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये बसलेले सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर वायरल करत या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर आणि काही लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या उपायुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांची बदली केली आहे. अधिकाऱ्यांची अशा प्रकारे बदली करणे चुकीचे असून यामुळे यापुढे इतर अधिकारी हे इतर इमारतींवर कारवाई करण्यास पुढे धजावणार नाहीत. तसेच कल्याण डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नचं राहील अशी खंत संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे.तसेच या प्रकरणात इमारतीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यासाठी काही लोकप्रतिनिधीनीं देखील दबाव आणला होता. जे अधिकारी काम करतात त्यांच्यावर अशाप्रकारे दबाव आणल्यास अधिकारी काम करणार नाहीत.
 अधिकाऱ्यांनी काम न केल्यास देखील लोकप्रतिनिधींची ओरड असते आणि आता कामं केल्यावर देखील अधिकाऱ्यांना निशाणा करणे हे चुकीचे आहे. संबंधित अधिकारी जर त्या जागेवर कार्यरत राहिले असते तर त्यांनी डीपी रस्त्यात येणाऱ्या आणखी इमारतींवर निश्चित कारवाई केली असती असा विश्वास वास्तुविशारद संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.         दरम्यान पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केडीएमसी मध्ये रुजू झाल्यापासून अनेक धडाकेबाज कामे केली असून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांच्यावर देखील जर अशाप्रकारे दबाव आणला गेला तर शहरातील विकासकामे कशी होणार असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments