लॉजिस्टिक स्टार्टअप पिकरद्वारे मोबाइल अ‍ॅप लॉन्चची घोषणा


■ ई-कॉमर्स विक्रेत्यांना एक सुलभ लॉजिस्टिक अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न ~


मुंबई, २३ सप्टेंबर २०२१  : सास आधारीत लॉजिस्टिक स्टार्टअप पिकरने वापरासाठी एकदम सोप्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लाँचिंगची घोषणा केली आहे. पिकर एसएमबी आणि डी२सी ब्रँड्सना एंट-टू-एंड लॉजिस्टिक्स आणि वेअरहौसिंग सोल्युशन प्रदान करते. पिकरच्या नव्या मोबाइल अ‍ॅपचे उद्दिष्ट टियर २ आणि टियर-३ बाजारातील ब्रँड्सना लॉजिस्टिक बाबतीत स्पर्धकांच्या तुलनेत जास्त प्रगती प्रदान करणे हे आहे. हे मोबाइल अ‍ॅप लहान ब्रँड्सना डेटा संचलित ऑपरेशनल दक्षता, डेटा इंटेलिजन्सपर्यंत पोहोच आणि ग्राहकांना मजबूत संचार सवलतीसह सक्षम बनण्याच्या पिकरच्या दीर्घकालीन वचनबद्धतेशी अनुकूल आहे. पिकर लॉजिस्टिक क्षेत्रात एकवेम असे ब्रँड आहे, जे १० प्रादेशिक भाषांमध्ये डॅशबोर्ड प्रदान करते.       हे अत्याधुनिक अ‍ॅप मजबूत टेक्नोलॉजी आराखड्यात बनवण्यात आले आहे. यातील अ‍ॅडव्हान्स आणि वापरासाठी सोप्या फीचर्सच्या माध्यमातून ई-कॉमर्स विक्रेत्यांना एक सुलभ लॉजिस्टिक अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. पिकरच्या अ‍ॅपसह ते चालत-फिरत आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स आणि महसूलाचे व्यापक विश्लेषण मिळवू शकतात. या अ‍ॅपचे यूझर आपल्या ग्राहकांच्या संपूर्ण ऑर्डर प्रोसेसिंग प्रवासाविषयीदेखील अपडेट ठेवू शकतात. त्यांचे ऑर्डर ट्रॅक करू शकतात. तसेच रियल-टाइममध्ये पॅकेजच्या फ्रेट्स रेट्सची मोजणी करू शकतात. तसेच कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी २४/७ कस्टमर सर्व्हिस सपोर्ट मिळवू शकतात.      पिकरचे सह संस्थापक आणि सीईओ रितिमा मजूमदार म्हणाले, "टियर २ आणि टियर ३ बाजारांत बिझनेसची मोठी संधी आहे. कोव्हिड-१९ ने एक कॅटलिस्टच्या रुपात काम केले आहे. बिझनेसला ऑनलाइन स्वरुपात बदलले आहे. ते बाजारात थेट विक्री करत आहेत किंवा थेट उपभोक्त्यांना विकत आहेत. ज्यांनी डेटाच्या ताकतीचा वापर करत ऑनलाइन विक्रीत परिवर्तन घडवले अशा व्यवसायांना सरळ आणि समर्थन देण्यासाठी पिकर वचनबद्ध आहे. मल्टीलिंग्वल डॅशबोर्डला लाँच केल्यानंतर वापरासाठी सोपे, डेटा लाइट पिकर अॅप्लिकेशन लाँच करणे स्वाभाविकच पुढचे पाऊल होते. टियर २ टियर ३ बाजारात आमम्हाला जास्त पसंती आहे. पिकरसाठी त्यातून तिपटीने लाभ होत आहे."

Post a Comment

0 Comments