प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी केली २७ गावातील पाहणी

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने कल्याण ग्रामीण भागातील २७ गावातील रस्तेनाले आणि कचरा या समस्याच सर्वाधिक उद्भवल्या आहेत. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. 

             त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी कुणाल पाटील यांच्या पत्रांची दखल घेत २७ गावातील आडीवली,ढोकळी,पिसवली आणि श्री मलंगगड रोडची संयुक्त पाहणी केली. यावेळी २७ गावातील विविध विकासकामांवर चर्चा देखील करण्यात आली आहे. 

            त्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेल्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना नगरसेवक कुणाल पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच २७ गावांच्या प्रश्नी लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट देखील घेणार आहेत. आयुक्तांना भेटून तातडीने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments