निराधार मुलांच्या आश्रम शाळेत फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा

 

■आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील यांची सामाजिक बांधिलकी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील यांनी आपल्या वयाचा ५२ वा वाढदिवस टिटवाळ्यातील पारस बाल भवनातील निराधार मुले तसेच जेष्ठ समवेत विविध फळांचे वाटप करून साजरा केला.गुलाबराव पाटील सर हे दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रम तसेच वंचित निराधार मुलांच्या आश्रमाला भेट देऊन खाद्य पदार्थांचे वाटप करून आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आणि सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून साजरा करीत असतात. गत वर्षा प्रमाणे या वर्षीही टिटवाळ्यातील भारत माता बहुउद्देशीय महिला मंडळ संचालित पारस बाल भवन येथे त्यांनी आपले सहकारी शिक्षकमित्र संजय वाघराहुल खंदारे व संतोष माने यांच्या समवेत जाऊन त्यांनी वंचित आणि निराधार मुलांबरोबर संवाद साधून त्यांना करून फळांचे वाटप केले. यावेळी पारस बाल भवनचे संचालक संजय गुंजाळ, संगीता गुंजाळ या दाम्पत्याचे सामाजिक कार्य पाहता त्यांचाही गुलाबराव पाटील यांनी यथोचित सत्कार केला.

Post a Comment

0 Comments