राष्ट्रीय पोषण माह अभियानाला कल्याण मध्ये सुरवात

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : बाल विकास प्रकल्य (नागरी )कल्याण जि. ठाणे अंतर्गत बुधवारी काळातलाव बिट क्र 07 बेतुरकरपाडा अंगणवाडी क्र 159 येथे प्रकल्प अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यसेविका अस्मिता मोरे यांच्या मार्गर्शनाखाली राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.पालकांमध्ये परिवर्तन घडवून आणने व त्यांना सकस आहार व आरोग्य यांचे महत्व पटवून देणे बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे,  किशोर वयीन मुलींमधील अँनीमीयाचे प्रमाण कसे कमी करता येईल  यासाठी प्रयत्न करणे. गरोदर व स्तनदा माता यांना आहारलसिकरण व स्तनपान याचे महत्त्व पटवून देणे हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालवधीत प्रकल्पातील १७३ अंगणवाड्यांमध्ये वेगवेवळ्या विभात विविध कार्यक्रम राबविले जातात.  बुधवारी काळातलाव विभागात कीशोरवयीन मुलींसोबत लेझिम घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली. यात काळातलाव विगातील सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जागतिक आरोग्य संघटनेचे डाँ. अरूण काटकर उपस्थित होते. तसेच विभागातील डॉ. पंकज उपाध्याय हे ही उपस्थित होते. त्याच बरोबर प्रकल्प अधिकारी प्रतापराव पाटील व मुख्यसेविका अस्मिता मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेविका शिल्पा बावकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन मुख्यसेविका अस्मिता मोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments