कल्याण मध्ये पावसाची मुसळधार

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली परिसरात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासुन कल्याण डोंबीवली परिसरात पावसाची रिप रिप सुरू होती. तर दुपारी कडक ऊन पडले होते.            काही वेळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी चार वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. सतत बरसत असणाऱ्या सरीमुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. 

Post a Comment

0 Comments