सिटी पार्क बाबत राष्ट्रवादीच्या अर्बन सेलने घेतली आयुक्तांची भेट नेहमी उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती कडे वेधले लक्ष
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याणमधील गौरीपाडा येथे उभारण्यात येत असलेल्या सिटी पार्क बाबत राष्ट्रवादीच्या अर्बन सेलने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. सिटी पार्क आणि आसपासच्या जागेत नेहमी उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. यावेळी निवेदन देताना व चर्चा करताना राष्ट्रवादी अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळेकल्याण-डोंबिवली शहर समन्वयक अमोल लांडे,  आनंद हजारेअमित खोत हे उपस्थित होते.कल्याण पश्चिमेत गौरीपाडा सुरू असलेला सुमारे १२५ कोरोड रूपये खर्च अपेक्षित असलेला सिटी पार्क हा मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट सलग दुसर्या वर्षी पाण्याखाली गेल्याने हा प्रकल्प वादाच्या भोवार्यात सापडला आहे. याबाबत राष्ट्रवादी अर्बन सेलचे प्रविण मुसळे हे पाठपुरावा करत आहेत. आयुक्तांच्या भेटीत २२ जुलै रोजी सिटी पार्कमध्ये आलेल्या पुराचे फोटो व विविध वृत्तपत्रांनी या विषयाची त्यावेळी घेतलेली गंभीर दखल यांची कात्रणे देण्यात आली. सिटी पार्कमध्ये नेहमी पुर परिस्थिति निर्माण होत असते त्यामुळे करोडो रुपये खर्च करुन सुशोभिकरण करणे किती योग्य आहे याचा पुनर्विचार आयुक्तांनी करण्याची गरज असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले.राष्ट्रवादी अर्बन सेलचा शहरांमधील विकासाला मुळीच विरोध नाही पण योग्य ठिकाणी करदात्या नागरिकांचे पैसे खर्च होणे अपेक्षित आहे. मुळातच राष्ट्रवादी अर्बन सेलचा मुख्य उद्देशच नियोजनबध्द शहरे कसे तयार होतीलविविध नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन शहरी नागरिकांना सोयी-सुविधा कशा उपलब्ध होतील व शहरी नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या कशा सोडवता येतील हे पाहणे असल्याचे प्रविण मुसळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments