झायउन इंडिया द्वारे स्मूथ क्यू३ आणि वीबिल २ गिंबलचा शुभारंभ
मुंबई, ८ सप्टेंबर २०२१ : झायउन, ह्या जगातल्या सर्वाधिक प्रसिद्ध कॅमेराज आणि स्मार्टफोन्सच्या गिंबल ब्रँडने भारतामध्ये 2 नवीन गिंबल्सचा शुभारंभ केल आहे व ते स्मूथ क्यू३ आणि वीबिल २ आहेत.      स्मूथ-क्यू३ मध्ये उद्योगामध्ये पहिल्यांदा असलेल्या फीचर्सद्वारे आपले व्हिडिओज लाईट अप करता येतील. जिंबल हा एक काँपॅक्ट, अनेक फीचर्स असलेला तीन एक्सिसच गिंबल आहे व त्यामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रोटेट करता येणारा फिल लाईट, १७ स्मार्ट टेंपलेटस येतात व त्यासह अतिशय सिंप्लिफाय केलेले व डिटेल्स असलेले डिझाईनही येते. गिंबलमध्ये ४,३०० के वॉर्म टोनचा इंटीग्रेट केलेला फिल लाईट व त्यासह ब्राईटनेस एडजस्ट करण्याच्या तीन लेव्हल्स येतात व त्यासह टच बटन कंट्रोल मिळते ज्याद्वारे १८०° फ्रंट व रिअर लाईट एडजस्ट करता येतो. ह्या विशेष फीचर्ससह ह्या ब्रँडने लो- लाईट सेटअप्समध्ये दीर्घ काळ असलेल्या आव्हानाला पहिल्यांदा हाताळले आहे.
         नवीन अतिरिक्त फीचर्समध्ये गेस्चर कंट्रोल, स्मार्ट फॉलो ३.० ऑब्जेक्ट ट्रॅकिंग, इन्स्टंट डॉली झूम आणि मॅजिक क्लोन पॅनोरमा आहे व ते टारगेट मार्क करून स्मार्ट फॉलोइंग सुरू करण्यासाठी ते एकाच प्रेस ट्रिगर बटनाद्वारे चालवले जाते. स्मूथ क्यू३ हे सर्व मुख्य एंड्रॉईड आणि एप्पल फोन्सद्वारे समर्थित आहे व त्यामध्ये सर्व कंटेंट क्रिएटर्स व इतरांसाठी अधिक चांगली गुणवत्ता मिळेल. हे उत्पादन ९०००/- रुपयांत झायउन इंडियासह अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा सर्व मुख्य ई- कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहे व त्याशिवाय प्रमुख कॅमेरा आणि सीई स्टोअर्सवरही उपलब्ध आहे.       शुभारंभ केलेले दुसरे गिंबल वीबिल २ हे प्रसिद्ध अशा डीएसएलआर गिंबल वीबिलचे सुधारित रूप आहे व त्यामध्ये प्रत्येक स्टिल किंवा व्हिडिओ कॅपच्युअर करण्यासाठी युजर्सना क्रिएटिव्हिटी व प्रोफेशनल गुणवत्ता अशा दोन्ही बाबी मिळतात.
      वीबिल २ हा असा पहिला गिंबल आहे ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध असा २.८८ इंच पूर्ण कलरचा फ्लिप आउट एचडी टचस्क्रीन आहे ज्यामध्ये कॅमेराच्य सर्व कंट्रोल्सना समर्थन केले जाते. ZY PLAY App ची गरज न पडता वन टच स्मार्ट फॉलो, टाईमलॅप्स आणि जेस्चर कंट्रोल्स हे वीबिल २ टचस्क्रीनद्वारे वापरून युजर्स इंटीलिजंट इमेजेससुद्धा बघू शकतात. वीबिल २ हा मुख्य मिरर शिवाय असलेल्या व डीएसएलआर कॅमेरा व लेन्स काँबीनेशन्ससाठी बनवण्यात आला आहे. हे उत्पादन ४९,०००/- रुपयांत झायउन इंडियासह अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा सर्व मुख्य ई- कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहे व त्याशिवाय प्रमुख कॅमेरा आणि सीई स्टोअर्सवरही उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments