गणेशोत्सवा मुळे कल्याणच्या फुल मार्केट मध्ये फुलांचा भाव वधारला
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : गणेशोत्सवामुळे  कल्याणच्या फुल मार्केटमध्ये फुलांचा भाव चांगलाच वधारल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे कोरोनाची भीती विसरून नागरीकांची फुले  खरेदीसाठी सकाळपासूनच झूबंड उडाली होती. मात्र  यावर्षीच्या गणपती उत्सवाला महागाईची झळ बसली आहे. यामुळे नागरिकांच्या आर्थिक चिंता वाढल्या असून   गणपतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.कोरोना आटोक्यात येऊ लागल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अजूनही आर्थिक घडी बसली नाही. त्यात पेट्रोलडीझेलघरगुती गसबरोबर खाद्य तेलाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. यावर्षी शासनाकडून करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सणावरील निर्बध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. यामुळे घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक आरास सजावटीला विशेष महत्व दिले जाते. यासाठी मोठय़ा प्रमाणत वेगवेगळ्या फुलांची मागणी होत असते.  या काळात मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री केली जाते.दीड दिवसांचे आणि पाच दिवसांच्या गणपतीची संख्या वाढल्याने फुलांची मागणी वाढली आहे. गणपतीच्या सजावटीसाठी झेंडूमोगरागुलाबशेवंतीयाच बरोबर परदेशी आर्केड,जरबेराकार्नेशियनजीडालीडेझी अशा फुलांची मागणी सुद्धा वाढली आहे. पण मागील दोन वर्षांच्या कोरना काळानंतर बाजार खुलले असल्याने ही फुले बाजारात उपलब्ध होत आहेत. पण त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. थर्माकोल आणि पीओपीच्या सजावटी पेक्षा नैसर्गिक सजावटीकडे नागरिकांचा कल असल्याने फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी मागणी होत आहे. मागील दोन वर्षांपासून फुलविक्रेते मोठय़ा आर्थिक संकटात सापडले होते. यावर्षी काही दिलासा मिळाला आहे. त्यात वाहतुकीचामजुरीचा खर्च वाढला असल्याने फुलांच्या किंमती वाढल्या असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.आजचा फुलांचा दर :

झेंडू  ८० ते १०० रु.किलो,  गुलाब   २०० ते २२५ रुपये,  शेवंती   १५० ते १८० रुपये  किलो,  मोगरा  ९० ते १२० किलोडेझी  ३० ते ५० रुपये जुडी,  अस्टर : ३० ते ४०,  कार्नेशियन :१६० ते १८०    रुपये १० फुले,   जीडाली  ११० ते १२० रुपये   १० फुले आर्केड   ९०० ते १०००  रुपये १० फुले,  जरबेरा : ८० -१०० रु.१० फुले

Post a Comment

0 Comments