आंबिवली बल्याणी रस्त्यावरील अपघात दोन जण जखमी जिवितहानी झाल्यावरच रस्ता दुरस्त होणार का?


■माजी नगरसेविका नमिता पाटील यांचा प्रशासनाला सवाल...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : आंबिवली बल्याणी रस्त्यातील नायलॉन प्लांट नजीक एक रिक्क्षा रविवारी रात्रीच्या सुमारास रस्यात टाकलेल्या ग्रीटमुळे पलटी झाल्याने या अपघातात रिक्षा चालकासह दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर  जिवितहानी झाल्यावरच रस्ता दुरस्त होणार का असा सवाल माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी  प्रशासनाला विचारला आहे.  आंबिवली बल्याणी रस्त्याची खड्यामुळे चाळण झाली असुन  एनआरसी कंपनीच्या भिंतीचे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. रविवारी रात्री ९ वा. सुमारास मानवली येथे राहणारे रिक्षा चालक कपिल गायकर हे  बल्याणी हुन आंबिवलीकडे प्रवासी घेऊन जात होते. नायँलन प्लांट नजीक ठेकेदाराने टाकलेल्या ग्रीट पावडरच्या ढिगार्यामुळे रिक्क्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक कपिल यांच्या हातावर तसेच प्रवासी सदाम् शेख यांच्या पायावर पलटी झालेल्या रिक्षाचा भार पडला. तेथुन जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने मदत करीत पलटी झालेल्या रिक्षातुन जखमी कपिलसह प्रवाशांना बाहेर काढले.त्यांना  तातडीने रक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. कपिल यांच्या हाताला फँक्चर झाले असुन सद्दाम यांच्या पायाला फँक्चर झाले असल्याचे रिक्षा चालक कपिल गायकर यांनी सांगितले. तसेच इतर रिक्षा चालक सहकार्यानी टिटवाळा पोलिसांना कळविले असल्याचे सांगत संर्दभीत ठेकदाराने निष्काळजीपणे टाकलेल्या ग्रीट पावडरच्या डिगार्यामुळे हा अपघात झाला असुन ठेकेदारवर कारवाई व्हावी अशी मागणी करणार आहोत असे सांगितले. प्र.क्र.११ शिवसेनेच्या माजी शिक्षण मडंळ सभापती नगरसेविका नमिता मयुर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. आंबिवली,  बल्याणीटिटवाळा रस्त्याच्यी खड्यामुळे दुरावस्था झाली असुन वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. प्रभागातील मुख्य रस्त्याचे प्राकलन तयार असुन देखील लाल फितीच्या कारभारामुळे अद्याप देखील पाठपुरावा करून रस्त्याची कामे मार्गी लागत नाहीत हे दुर्दैवच् म्हणावे लागेल. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे संभाव्य अपघात होऊन जिवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. आगामी पंधरा दिवसांत प्रभागातील मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने आ़ंदोलन करणार असल्याचे सांगितले.      


       

कल्याण डोंबिवली शहर अभियंता सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता बल्याणी प्रभागातील मुख्य रस्त्याच्या कामासंर्दभात नवीन डीएसआर नुसार प्राकलन तयार करण्याचे सुरू असुन लवकारात लवकर बल्याणी  प्रभागातील मुख्य रस्त्याच्या कामाच्या निविदा काढण्यात येतील असे सांगितले.          


                       

             तर अ प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांना अपघाता संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीआदाणी समुहाच्या भितींचे दुरुस्तीचे काम सुरु असुन आंबिवली बल्याणी रस्त्यावर ठेकेदाराने ग्रीट पावडरचे ढीग टाकल्याबाबत एसआय यांना सुचना करून ढिगारे काढुन, त्यासंदर्भात दंडात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे."

Post a Comment

0 Comments