वापरलेल्या वाहनांच्या विक्रीत पहिल्या सहा माहीत वाढ: ड्रूम


■डिझेल कारपेक्षा पेट्रोल व्हेरिएंटला अधिक प्राधान्य मारुती सुझुकी वितारा ब्रेझा आणि बजाज पल्सर अनुक्रमे सर्वात लोकप्रिय कार आणि बाईक ~


मुंबई, १४ सप्टेंबर २०२१ : यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत वापरलेल्या (युज्ड) वाहनांच्या विक्रीत उल्लेखनीय वाढ झाल्याचे ड्रूम या भारतातील सर्वात मोठ्या  आणि अग्रगण्य ऑनलाइन ऑटोमोबाईल ट्रान्झॅक्शनल प्लॅटफॉर्मने जाहीर केलेल्या विक्री ट्रेंड डेटामधून निदर्शनास आले आहे. साथीच्या रोगामुळे वैयक्तिक गतिशीलता हा वाहतुकीचा प्राधान्याचा मार्ग ठरला. यामुळे ड्रूमने चारचाकी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविली आणि दुचाकीच्या विक्रीत देखील वाढीचा ट्रेंड अनुभवला. चारचाकी वाहनांमध्ये मारुती सुझुकी वितारा ब्रेझा ही सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली असून बालेनो, होंडा सिटी आणि ह्युंदाई वेर्ना सारख्या प्रीमियम कारदेखील लोकप्रिय ठरल्या आहेत. दुचाकीच्या श्रेणीत बजाज पल्सर हे सर्वात लोकप्रिय वाहन असून त्यानंतर होंडा क्टिव्हा 3 जी आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर हे वाहन आहे. लक्झरी व्हेइकल श्रेणीत कावासाकी निंजा आणि मर्सिडीज- बेंझ ई क्लास अनुक्रमे सर्वात लोकप्रिय लक्झरी बाईक आणि कार ठरल्या.गेल्या ६ महिन्यांत, खरेदीदारांनी डिझेल कारपेक्षा पेट्रोल व्हेरिएंटला अधिक प्राधान्य नोंदवले. 'मेक इन इंडिया' उपक्रमाला आणखी चालना देत भारताने तयार केलेली वाहने जपानी आणि ऑस्ट्रेलियन वाहन उत्पादकांच्या पाठोपाठ आलेखात अग्रस्थानी आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये स्वयंचलित कारपेक्षा बहुतेक ग्राहकांनी मॅन्युअल मॅन्युअलची निवड केली. ड्रूम ट्रेंड रिपोर्टमध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे, दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद हे सर्वाधिक वाहनांची मागणी नोंदविणारा अव्वल बाजार असल्याचेही समोर आले.ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले, "आम्ही ड्रूम मध्ये डिजिटल वापराला आणखी चालना देण्यासाठी आणि वेगवान पध्दतीच्या वापरासाठी वचनबद्ध आहोत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील वाहन व्यवहारांच्या शतकानुशतके जुन्या पद्धतीत क्रांती घडवत त्याला सक्षम करत आहोत. २०२१ हे मानवी जीवनावर कठोर आघात करणारे ठरले. परंतु, व्यवसाय आणि उद्योगांनी लवचिकता दर्शवत बाजारात आलेली मरगळ झटकली आणि व्यवहार पूर्ववत होण्यास मदत झाली. व्यावहारिक पातळीवर आणि सुरक्षिततेसह विविध कारणांमुळे वैयक्तिक गतिशीलतेसाठी बाजार जलदगतीने पूर्वपदावर आले.साथरोगाच्या कारणाने कमी उत्पन्न किंवा नोकरी गमावल्यामुळे अनेक लोकांसाठी आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. परिणामी वापरलेली वाहने स्वीकारण्यास ग्राहकांत चालना मिळाली."

Post a Comment

0 Comments