एंजेल ब्रोकिंगने ऑगस्ट मध्ये वार्षिक १४५.७% ग्राहक वृद्धीची नोंद केली
मुंबई, ९ सप्टेंबर २०२१ : फिनटेक प्लॅटफॉर्म एंजेल ब्रोकिंग लिमिटेडने ऑगस्ट २०२१ महिन्यात ६.१५ दशलक्षांची सर्वोच्च ग्राहक वृद्धी नोंदवली असून, वर्षानुवर्षांच्या १४५.७% वाढीचे प्रतिनिधित्व कायम ठेवलं आहे. कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्ये ०.४५ दशलक्ष ग्राहक जोडले, ज्यात १५०.१% वार्षिक वाढ झाली, जी ऑगस्ट २०२० मध्ये ०.१८ दशलक्ष एकूण ग्राहक अधिग्रहणापेक्षा दुप्पट आहे. आर्थिक वर्ष २२ च्या पाच महिन्यांत, फिनटेक प्लॅटफॉर्मने २ दशलक्षांहून अधिक ग्राहक जोडले आहेत, जे आर्थिक वर्ष २१ मध्ये जोडलेल्या अंदाजे २.४ दशलक्ष ग्राहकांपैकी ८८% पेक्षा जास्त आहेत.        आर्थिक वर्ष २२ मध्ये, हा सलग चौथा महिना आहे जेव्हा एंजल ब्रोकिंगने एका महिन्यात ०.४० दशलक्षांहून अधिक ग्राहक जोडले. सहज सुलभ डिजिटल सोल्यूशन्समुळे कंपनीने टियर २ आणि टियर ३ आणि या शहरांच्या पलीकडील प्रवेश न झालेल्या बाजारपेठांमध्ये मारलेली मुसंडी ग्राहक अधिग्रहणातील मजबूत वाढीचा परिणाम आहे. अलीकडेच, कंपनीने नवीन युगातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व आर्थिक गरजांसाठी एक थांबा असलेल्या एंजल वनला रिब्रँड केले.       एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी प्रभाकर तिवारी म्हणाले, "भविष्यातील तंत्रज्ञान दैनंदिन कामकाजात समाविष्ट करण्याची आमची रणनीती आमच्या ग्राहकांसाठी चांगली कामी ठरली आहे. आम्ही आमच्या वाढत्या क्लायंट बेसची सेवा करण्यासाठी आमची क्षमता मजबूत केली आहे आणि शक्य तितक्या लोकांना सेवा देण्याची आशा केली आहे.आपल्या तंत्रज्ञानाने प्रगत डिजिटल मालमत्ता असलेल्या टियर २, टियर ३ आणि शहरांच्या पलीकडे असलेल्या भारतीयांना शेअर बाजार सुलभ करून, आम्ही त्यांना त्यांची गुंतवणूक स्वप्ने आणि त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात मदत करीत आहोत. अँजेल वनमध्ये नुकत्याच झालेल्या रिब्रँडिंगमुळे, आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुच्छांत आमचा क्लायंट बेस वाढविण्यास उत्सुक आहोत."       एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, "आम्हाला आनंद आहे की, आमच्या ग्राहकांना विविध व्यासपीठांच्या स्वरूपात आमच्या वेळेवर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा फायदा होत आहे. एआरक्यू प्राइम पासून अँजेल बीई, स्मार्ट मनी आणि स्मार्टएपीआय पर्यंतच्या आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग-आधारित सोल्यूशन्समुळे तंत्रज्ञानप्रेमी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे सोपे झाले  आहे. भौगोलिक सीमा ओलांडत,आम्ही वाढत्या एंजल कुटुंबाला  उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान-चालित उपाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहू जे ब्रोकिंग सेवेच्या पलीकडे जात आहेत."

Post a Comment

0 Comments