भाजपाच्या वतीने धावपटू गायत्री जोशीचा सन्मान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  व्या स्टूडेंट ऑलिम्पिक नॅशनल गेम २०२१ मध्ये २०० मीटर व ७०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक व रजत पदक पटकावत कल्याणचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या गायत्री जोशी हिने उंचावले आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चा कल्याण शहर अध्यक्ष साईनाथ गोईकणेसरचिटणीस किरण चौधरी, भाजपा विद्यार्थी आघाडी संयोजक कल्याण शहर मिथिल जोशी यांनी गायात्रीचा सत्कार केला. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिचे मनोबल आणखी वाढवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिन निमित्त सेवा आणि समर्पण अभियाना अंतर्गत अनेक क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार सोहळा करत त्यांचे कौतुक करण्याचे कार्यक्रम भाजयुमो कल्याण शहर आणि भाजपा विद्यार्थी आघाडी कडून राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत धावपटू गायत्री जोशी हिचा सन्मान करण्यात आला. दरम्यान यापुढे देखील भारतीय जनता पार्टी परिवार अशा मुलांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावण्यात येईल असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments