भारत बंदमध्ये ठाण्यात काँग्रेसची गांधीगिरी
ठाणे , प्रतिनिधी   :   भा.ज.पा.सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते,ठाण्यातील काँग्रेस पक्षाने या बंदला जाहीर पाठींबा जाहीर करून स्टेशन रोड परिसरातील दुकानदाराना व आस्थापनाना गांधीगिरी मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.         ठाणे शहर काॅग्रेसच्या(जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन रोड परिसरातील दुकानदाराकडे जाऊन गांधीगिरी करीत बंद मध्ये सामील व्हा असे आवाहन करीत फीरले, या प्रसंगी ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे,भालचंद्र महाडिक,सुखदेव घोलप ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे,महेंद्र म्हात्रे,धर्मवीर मेहरोल,रेखा मिरजकर,चंद्रकांत मोहिते,आदि पदाधिकारी सहभागी झाले होते .
          या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,केंद्रातील भा.ज.पा.सरकारने एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारून दुसरीकडे महागाई वाढवून देशातील सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन, सार्वजनिक संस्था विकून शेतकरीवर्ग व सामान्य देशोधडीला लावण्याचे पाप  सरकार करित आहे.         या जुलमी व अत्याचारी भा.ज.पा.सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहनात सर्व व्यापारी वर्गाला आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर गांधीगिरी करित भारत बंदमध्ये सहकार्य करावे अशी विनंती केली व्यापारी बाधवांनीही आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना शेवटी सांगितले. 

Post a Comment

0 Comments