कल्याण , कुणाल म्हात्रे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व सहा. आयुक्त यांना दिलेल्या निर्देशानुसार क प्रभागातील सहा. आयुक्त संजय साबळे यांनी दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरुट मध्ये दुर्गाडी चौक येथे बाधित होत असलेल्या ३ अनधिकृत टप-या व १ शेड निष्कासनाची धडक कारवाई आज केली. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, आधारवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी आणि १ हायड्रा व १ ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे ब प्रभागातही सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी बारावे गावातील आरक्षित भूखंडावरील ४ गाळे व २ घरे निष्कासनाची कारवाई आज केली. तसेच रिंगरोडवरील २ हातगाडया देखील जमा करण्याची कारवाई देखील करण्यात आली. सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व महापालिका पोलिस व खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १ जेसीबी व १ डंम्पर यांचे सहाय्याने करण्यात आली.
ड प्रभाग क्षेत्रातही सहा. आयुक्त सविता हिले यांनी पुना लिंक रोड, मलंग रोडवरील वाढीव शेड, अतिक्रमणांवर धडक कारवाई करत एकुण ६५ अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात केली. हि कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १ जेसीबी व १ ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
0 Comments