माचो स्‍पोर्टोचे टोइंगसह पुनरागमन! फिमेल गेझला उत्‍साहाने चालना देणारी नवीन मोहिम सादर


■विकी कौशलचे पाठबळ असलेल्‍या आघाडीच्‍या मेन्‍स अंडरवेअर ब्रॅण्‍डसाठी दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना या मोहिमेमध्‍ये नेमके काय करत आहे? 


मुंबई, सोमवार, ३० सप्‍टेंबर २०२१  :-   माचोने २००७ मध्‍ये महिलांच्‍या आकांक्षांवर लक्ष केंद्रित करत माचो अंडरवेअरसाठी साहसी 'ये तो बडा टोइंग है' टीव्‍हीसी लाँच करत जेन्डर संबंधित रूढींमध्‍ये बदल केला. या दृष्टिकोनाला उत्तम दर्जा मिळत असताना ब्रॅण्‍ड फिमेल गेझला चालना देण्‍याच्‍या कटिबद्धतेसह माचो स्‍पोर्टो लाँच करत दशकानंतर परतला आहे.         या टीव्‍हीसी सिरीजमध्‍ये दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि ए-लिस्‍ट बॉलिवुड स्‍टार विकी कौशल आहे. मेन्‍सवेअर उत्‍पादनासाठी जाहिरातीमध्‍ये रश्मिका सारख्‍या प्रमुख अभिनेत्रीचे कास्टिंग रूढींमध्‍ये बदल घडवून आणण्‍याच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे.


          या मोहिमेबाबत बोलताना लिओ बर्नेटचे दक्षिण आशियामधील सीईओ व चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर राजदीपक दास म्‍हणाले, ''आमची मोहिम 'ये तो बडा टोइंग है २.०'च्‍या माध्‍यमातून आमची जेन्डर संबंधित जुन्‍या रूढींना मोडून काढण्‍याची इच्‍छा होती. विशिष्‍ट इनरवेअर ब्रॅण्‍ड्स पारंपारिक पुरूष-प्रभुत्‍व असलेल्‍या प्रतिमेला दाखवतात, पण आमच्‍या जाहिराती याविरूद्ध बाबीला दाखवतात, जेथे आम्‍ही महिलांना स्थितीचे नियंत्रण करण्‍यास पुढाकार घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित करतो.          मेन्‍स वेअर ब्रॅण्‍ड महिलेला प्रमुख भूमिकेत दाखवण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. या जाहिराती हलक्‍या-फुलक्‍या आहेत आणि या जाहिरातींमध्‍ये ब्रॅण्‍डचे सिग्‍नेचर गालातल्‍या गालात हसायला लावणारे वैशिष्‍ट्य असण्‍यासोबत विकी व रश्मिकाने त्‍यांच्‍या भूमिका चोखपणे बजावल्‍या आहेत.''


नवीन माचो स्‍पोर्टो 'ये तो बडा टोइंग है' डिजिटल जाहिराती https://www.youtube.com/watch?v=N_ngijP3vRQ|https://www.youtube.com/watch?v=EGZK7U9sMyA येथे पाहा.


Post a Comment

0 Comments