शैलेश कांबळे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई , प्रतिनिधी  :  बॉलिवुड-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ह्रिदमिस्ट आर्टिस्ट शैलेश कांबळे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने संगीत क्षेत्रामधील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार २०२१ चा जाहीर झाला आहे. लवकरच हा पुरस्कार विशिष्ट कार्यक्रमात प्रधान करण्यात येणार आहे.शैलेश कांबळे यांने अनेक बाॅलिवुड मराठी इंडस्ट्रीतील गायक, संगीतकारांन सोबत काम केलं आहे.        शैलेशने चित्रपट,अल्बममधील गाण्यांना अनेक प्रकारची वाद्य वाजवली आहेत.शैलेश मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील.शैलेश कांबळे ला महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आनंदाचा क्षण असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शैलेशच कौतुक केलं आहे.महाराष्ट्रातून अनेकांनी शैलेशला शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं.          महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शैलेशच्या अजून जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. भारतातून अनेक कलाकार मुंबई शहरा मध्ये आपलं स्वत:चं करिअर घडवण्यासाठी येतात.आणि आज त्यांची करिअर झाली आहेत हे आपल्याला माहीतचं आहे.शैलेशने संगीत क्षेत्रात मिळालेल्या संधीतून आपल्यातील कलाकाराला वाट करून दिली.         आणि आज त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून महाराष्ट्रामध्ये शैलेश कांबळे याचा चाहता वर्ग सुध्दा खूप मोठा आहे.तसेच सोशल मिडियावर देखील चाहतावर्ग खूप मोठा आहे.

Post a Comment

0 Comments