स्टार प्रवाह वरील मालिकेत भगवान गौतम बुद्धांची विटंबना रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा
ठाणे (प्रतिनिधी)- स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेल्या एका माालिकेमध्ये भगवान गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर वाहिनीचे संचालक, निर्माते आणि ड्रे स डिझायनर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीच नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.           भैय्यासाहेब इंदिसे यांनी युा संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. या प्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.              भैय्यासाहेब इंदिसे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सायंकाळी  9.30 वाजता सुख म्हणजे नक्की काय असते, नावाची एक मालिका सुरु आहे. ही मालिका कौटुंबिक स्वरुपाची असून दररोज प्रसारीत होत असते. इतर मालिकांप्रमाणेच ही मालिका असून त्यामध्ये नाविन्य असे काही नाही. मात्र, या मालिकेच्या दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी प्रसारीत झालेल्या भागामध्ये बौद्ध धर्मियांचे आराध्य भगवान गौतम  बुद्ध यांचा अवमान करण्यात आलेला आहे.         या मालिकेतील एक पात्र सँडी नावाच्या एका महिला पात्रासाठी कपड्यांची निवड करणार्‍या (ड्रेस डिझायनर)  व्यक्तीने जाणीवपूर्वक सँडी हिस एक निळ्या रंगाचे ब्लॉऊज परिधान करण्यास लावले आहे. या ब्लॉऊजवर पांढर्‍या रंगामध्ये तथागत गाौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलेले आहे.           तथागत गौतम बुद्ध हे जगभरातील बौद्धांसाठी अत्यंत पूजनीय आणि पवित्र आहेत. असे असतानाही स्टार प्रवाह आणि संबधित मालिकेच्या निर्मात्याने जाणीवपूर्वक अंतवस्त्रामध्ये गणना होणार्‍या ब्लॉऊजवर तथागत गौतम बुद्धांचे चित्र छापून सर्व बौद्धांच्या भावना दुखावल्या आहेत. 

  


           या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन सदर वाहिनी, मालिकेचे निर्माते, ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हा दाखल करावा; अन्यथा, रिपाइं एकतावादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments