प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तेजस्विनी सोगम हिचे सीए परीक्षेत यश अलका सावली प्रतिष्ठानने केला जाहिर सत्कार
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कल्याण मधील तेजस्विनी विकास सोगम या विद्यार्थिनीने सीए परिक्षा उत्तीर्ण केली आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या सीए परीक्षेत तेजस्विनीने नेत्रदीपक यश मिळविल्याने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून कल्याण मधील अलका सावली प्रतिष्ठानने तिचा सत्कार केला आहे.

      


           कल्याण पश्चिमेतील बेतुकर पाडा परिसरातील शिवाजी नगर येथे चाळीत राहणाऱ्या तेजस्विनी सोगम हिच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी एकूण ४ बहिणी आणि एक लहान भाऊ. वडील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन तर आई मीना हि घरोघरी काम करतेय. सोबत एक वयोवृद्ध आजी. चाळीतले दीड खोल्यांचे घर यामुळे अभ्यास करायला सोयिस्कर जागा नाही.               अश्या सर्व विपरीत परिस्थितीत सीए सारखी परिक्षा उत्तीर्ण होणे हि खूप मोठी कामगिरी आहे. तेजस्वीनी हि इतर विद्यार्थ्यांना आदर्शवत असून त्याबद्दल तिचा अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संथापक अध्यक्ष सुधीर वायले, प्रा. अर्जुन उगलमुगले, शिक्षक सुशीलकुमार दुसाने, बंडू कराळे आणि  सागर वाघ आदीजण  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments