शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

 डोंबिवली ( शंकर जाधव ) माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष हरीष जावकर, डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे, वॉड अध्यक्ष ओमकार बागडे, केतन राणे, रोहन पवार,विभागीय अध्यक्ष समीर कांबळी आदि उपस्थित होते.        यावेळी राणे म्हणाले,आमदार चव्हाण यांनी आजवर अनेक रुग्णांची सेवा केली. आज शास्त्रीनगर रुग्णालयाचा जो कायापालट पाहत आहात त्याचे श्रेय आमदार चव्हाण यांचेच आहेत.तर जावकर यांनी आमदार चव्हाण यांनी दिलेल्या शिकवणीनुसार समाजसेवा करत आहोत.

Post a Comment

0 Comments