गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांचे लसीकरण करण्याची मनसेची मागणी


■माजी आमदार प्रकाश भोईर यांचे  मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांचे लसीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांना पत्र दिले आहे.                सध्या कोरोन रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तरी देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच गणेशोत्सव देखील तोंडावर आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळातील कार्यकर्ते हे सजावट व गणेशोत्सवाचा तयारीत एकत्र काम करत असतात.               तसेच या उत्सवादरम्यान नागरिक दर्शनासाठी व आरतीसाठी येत असतात. यामुळे मंडळातील सदस्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तरी मंडळातील कार्यरत सदस्यांची यादी घेऊन त्वरित त्यांचे लसीकरण पालिकेमार्फत करण्याची मागणी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केली आहे. 


Post a Comment

0 Comments