■डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या पाठपुराव्याला यश...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा गणेशवाडी परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
गणेशवाडी येथील नागरिक आपल्या मूलभूत सोई सुविधांपासून अनेक वर्षे त्रस्त असून अनेक वर्षापासून रस्ते, पायवाट, गटार, दिवे पिण्याच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत. अनेक वेळा नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या समस्या जैसे थे होत्या.
अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या सचिव संगीता वशिष्ट यांनी गणेशवाडी परिसराला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला.
लवकरात लवकर या समस्या न सोडवल्यास पक्षाच्या वतीने आंदोलनाच इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. याचीच दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने गणेशवाडी परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. रस्त्याचे काम सुरू होताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून नागरिकांनी सचिव संगीता वशिष्ट यांचे आभार मानले आहेत.
0 Comments