महिलांनाही साहित्यिक क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व कल्याण च्या कार्यक्रमातून उलगडला साहित्यिक प्रवास

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महिलांनाही साहित्यिक क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व आहे. याची जाणीव करून देणारा कार्यक्रम शनिवारी कल्याणमध्ये लेखिकाकवयित्री अनिता कळसकर यांच्या पुढाकाराने पार पाडला. शब्दसुमने साहित्यिक मंचच्या संस्थापिका अनिता कळसकर यांनी त्यांच्या पहिल्या शब्दसुमने साहित्यिक मंचच्या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात केले होते. साहित्य क्षेत्रातही महिला अग्रेसर आहेत हे कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी दाखवून दिले.
       
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन वसईच्या प्रसिद्ध कवयित्री शिल्पा परूळेकर-पै आणि वृत्तवाहिनी निवेदिका ललिता मोरे यांनी केले. विशेष म्हणजे सूत्रसंचलन करताना परूळेकर आणि मोरे या दोघींनी आपल्या काव्यमय शब्दांनी उपस्थित रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले होते. कवयित्री अनिता कळसकर यांनी शब्दसुमने साहित्यिक मंचच्या पहिल्या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे ऋतूरंग आणि अंतरंगातील पाऊस अशा दोन सत्रांत नियोजन केले होते.

             
पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी कवी योगेश जोशीतर दुसरा सत्राचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे होते. निमंत्रित कवी/कवयित्रींमध्ये सुनिता बोरसे यांनी त्यांच्या भक्तीने आनंद वाढविला. तर संवेदना शब्दखड्गचे दीपक जाधव यांनी परखडपणे कवितेच्या माध्यमातून संवेदना मांडल्या. प्रविण जोशी यांनी कोरोनाच्या काळातल्या मानवावर ओढवलेल्या प्रसंगाची व्यथा व्यक्त केली.

              उपस्थित कवी/कवयित्रींनी या कार्यक्रमातत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रशांत मोरे यांनी काव्यमय शब्दांनी आपल्या ढंगात कवितेचे गायन करून रसिकांची मने जिंकली. आयोजक कवयित्री अनिता कळसकर यांनी आपल्या शब्दसुमने साहित्यिक मंचावरून नवोदित साहित्यिक यांना ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे उपस्थित सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता.        
   
         
अंतरंगातील पाऊस या दुसऱ्या सत्रात रसिकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले. काव्यसंमेलनाला लाभलेले विशेष अतिथी नेफडोचे कोकण विभाग अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रकाश कदमअपंग विकास संघाचे अध्यक्ष अशोक भोईररंगकर्मी सुधीर चित्ते यांचाही सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ तसेच देऊन सत्कार करण्यात आला.
                  

               विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६० कवी आणि कवयित्रींचाही सन्मानपत्रसन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर निवेदिका ललिता मोरे आणि शिल्पा परूळेकर-पै यांचाही शालपुष्पगुच्छसन्मानपत्रसन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
              
शब्दसुमनेच्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्यिक काव्यसंमेलनात महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्री सहभागी झाले होते. पुण्याहून शरयू कुलकर्णीडोंबिवलीहून शुभदा देशपांडेअश्विनी मुजुमदारदिपश्री इसामेयशवंत माळीतानाजी शिंदेडाॅ. ईशा कुलकर्णीभाग्यश्री हिरेउमाकांत आदमानेअवधूत शेलारसुरेखा गायकवाडवसईकरबापूसाहेब सोनावणेविजया शिंदेदीपक जाधवप्रविण देशमुखश्रद्धा खानापूरकरआदी अनेक साहित्यिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments