महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि महिला पोलिसांचीही गस्त हवी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांचीही प्रत्येक ठिकाणी गस्त हवी असल्याची मागणी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी मानपाडा पोलिसांकडे केली आहे. डोंबिवली बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनला भेट देत या प्रकरणाची माहिती जाणून घेतली तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची देखील मागणी केली.           यावेळी मंत्री अस्लम शेख, जिल्हाध्यक्ष सचिन पोटेकल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णीप्रदेश सचिव संतोष केणे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखा मिरजकर, ब्लॉक अध्यक्ष शबाना शेख, जयश्री टेंबुलकर, मीनाक्षी घुमरे, उज्वला पाटील आदी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


डोंबिवली मध्ये अल्पवयीन मुलीवर जो सामूहिक बलात्कार आणि कल्याण पश्चिम मध्ये एका शिक्षका द्वारे स्वतःच्याच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंगाचा प्रकार घडला तो खूपच निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. 


त्या प्रकरणा संदर्भात वस्त्रोद्योग,मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशन आणि कल्याण मधील बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून या घटनेचा निषेध व्यक्त केला. 


गुन्ह्यातील अटक आरोपींना कठोर शिक्षा केल्यास कल्याण डोंबिवली शहरात अशा प्रकारचे गुन्हे घडण्यास आळा बसेल आणि सामान्य घरातील तरुणींच्या मनातील भीती कमी होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments