शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा ....महापौर प्रतिभा पाटील यांचे आवाहन

भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) कोरोनाचा पार्श्वभूमीवर आपण सर्वजण गणेशोत्सव साजरा करीत आहोत. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही याचे भान देखील बाळगणे आवश्यक आहे. तसेच वेगवेगळ्या तज्ञांकडून कोरोनाचा तिसरा लाटेचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.              या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य शासनाने गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या शासनाच्या मार्गदर्शक सूचना सर्वांना आवश्यक असून या सूचनांप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव सगळ्याने शहरात आनंदाने साजरा करावा, असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे बाबत माननीय महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक महापालिकेत घेण्यात आली त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील बोलत होत्या.               यावेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर इम्रान वली मोहम्मद खान,भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे योगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश दिवटे, भाजपचे गटनेते हनुमान चौधरी कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील नगरसेवक हलीम अन्सारी, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व अन्य पदाधिकारी यांचे बरोबरच तसेच पालिकेचे अधिकारी, टोरंट पॉवरचे, पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
           महापौर प्रतिभा पाटील पुढे म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम न करता   आरोग्यविषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान, आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात यावेत. साथीचे आजार जसे  मलेरिया, डेंग्यू इतर साथीचे आजार व त्यावर करण्यात येणारे उपाय यासंबंधीची माहिती देण्यात यावी.कोरोनाबाबत जनजागृती करण्यात यावी. 
 गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा  करावा असे आवाहन देखील महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले. 
            तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनाची सोय ऑनलाइन पद्धतीने, केबल, नेटवर्क, फेसबूक इत्यादी द्वारे करून देण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र साफसफाई राहिल स्वच्छता ठेवण्यात यावी, जंतुनाशक औषध फवारणी करावी, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा,सर्व प्रमुख रस्त्यांवर डागडुजी करून खड्डे बुजवण्यात यावेत, रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. सर्व विसर्जन घाटांवर योग्य त्या सर्व  अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश देखील महापौर प्रतिभा पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत.      
          यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी देखील सांगितले की महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार विसर्जनाच्या दिवशी सर्व प्रकारे चांगल्या प्रकारे व्यवस्था महापालिका करेल. तसेच   पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले की, सर्व गणेशोत्सव मंडळ व गणेशभक्त यांनी जर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍ नच  निर्माण होणार नाही आपण सर्व कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करूया. महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काळात येणाऱ्या अडचणी पालिका व पोलीस प्रशासनासमोर मांडल्या.

Post a Comment

0 Comments