करोना काळात सेवा देताना कुणी पाणी हि विचारेना रुग्णवाहिका चालकांची खंत
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना काळात सतत रुग्ण सेवा देत असताना आमच्या जवळही येत नव्हते.आम्ही जेवलो का , पिण्यासाठी पाणी हव का अस कोणी म्हणत नव्हते.मात्र तरीही आम्ही रुग्णांना सेवा देणे थांबविले नाही.करोना रुग्णांना रूग्णालयात घेऊन जाण्याचे काम करत होतो.त्यावेळी खरी आम्हाला कौतुकाची थाप हवी होती अअशी खंत रुग्णवाहिकेच्या चालकांनी वाहतूक पोलिसांशी १७ सप्टेंबर जागतिक चालक दिनी बोलताना व्यक्त केली.

   


        जागतिक चालक दिनानिमित्त डोंबिवली वाहतूक उपशाखेच्या वतीने रुग्णवाहिका चालक, महिलांसाठी विशेष बससेवा देणाऱ्या `तेजस्विनी` बसचालक आणि रिक्षाचालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी रुग्नावाहीकेच्या चालकांनी करोना काळात आलेल्या अनुभवाबाबत पत्रकारांशी संवाद साधला.रुग्णवाहिकेचे चालक अलम अन्सारी म्हणाले, लॉकडाऊन  मध्ये आम्हाला कोणी पाणी देत नव्हते.           करोना रुग्णांना आम्ही स्वतः उचलून रुग्ण वाहिकेत नेण्याचे काम केले आहे. लोक आमच्या पासून दूर जात होते.पण आम्हीही कधीही करोना रुग्णांपासून दूर  गेलो नाही.वाहतूक पोलिस  निरीक्षक उमेश गीते म्हणाले, १७ सप्टेंबर जागतिक चालक दिनी पोलिसांकडून छोटेखाणी सत्कार केला.चालकांचे काम अविरत चालू राहावे म्हणून हा दिवस साजरा केला. रुग्णवाहिका हि लाईलाईनचे काम करत असते. रुग्नावाहीकेच्या चालकांचे काम उल्लेखनीय आहे.

Post a Comment

0 Comments