हिंदी शाळेतील मुख्याध्यापका कडून शिक्षिकांना मानसिक त्रास


■सेवाज्येष्ठता नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील शिक्षकांना बढती व इनकक्रिमीटची खैरात


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : हिंदी स्कूलच्या मुख्याध्यापकांनी मनमानी कारभार करीत सेवाज्येष्ठता नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील शिक्षकांना बढती व इनकक्रिमीटची खैरात केली असून आपल्या अधिकारांच्या सेवा पुस्तिकाशेरे बुक, वेतन पावती आदिची मागणी केल्याने हिंदी शाळेतील मुख्याध्यापकाकडून शिक्षकांनाकारणे दाखवा नोटीस देत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप या शाळेतील शिक्षिका सरिता सिंह यांच्यासह इतर शिक्षिकांनी यांनी केला आहे.       हिंदी प्रचार मंडल द्वारा संचालित हिंदी स्कूल रामनगरडोंबिवली (पूर्व) या शाळेत सरिता सिंह या सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शाळेत आपले सर्विस बुक आणि इतर कागदपत्रे देण्याची मागणी केल्यानंतर त्यांना शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था सचिव चंद्रजीत सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांनी पाठवलेल्या या नोटीसमुळे सरिता सिंह आणि इतर शिक्षकांना निलंबित करण्याच्या तयारीत असून हे चुकीचे असल्याचे सरिता सिंह यांनी सांगितले.       मुख्याध्यापकांचा त्रास सहन करत या शिक्षिका आपले कर्तव्य बजावत असून मुख्याध्यापकांची पत्नी गीता चंद्रजीत सिंह या देखील सहाय्यक शिक्षिका या पदावर असून तीस वर्षाच्या कार्यकाळात त्या एकही दिवस शाळेत आल्या नसून घरबसल्या त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप सरिता सिंह यांनी केला आहे. तर याबाबत शिक्षण विभागाला माहिती असून देखील त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सरिता सिंह यांचे म्हणणे आहे.       आपले सर्विस बुक आणि इतर हक्कांच्या बाबी आपल्याला मिळाव्या आणि मुख्याध्यापकांच्या त्रासापासून मुक्तता करण्याची मागणी सरिता सिंह यांच्यासह बबिता केणीरेणू सिंहसुनिता शर्मामीना कनौजियाआशिया बानोलक्ष्मी झानिशा शास्त्रीममता सिंहसुप्रिया गुरवसारिका सिंह आणि रंजना सिंह या शिक्षिकांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्तकेडीएमसी प्रशासनाधिकारीजिल्हा परिषद शिक्षणाधिकारीमुंबई शिक्षण उपसंचालकशिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणेवेतन अधीक्षक ठाणेवरिष्ठ लेखाधिकारी आदींना निवेदन दिले आहे. आपल्या अधिकारांच्या कागदपत्रांची मागणी केल्याने हिंदी शाळेतील मुख्याध्यापकाकडून शिक्षकांनाकारणे दाखवा नोटीस देत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप या शाळेतील शिक्षिका सरिता सिंह यांनी केला आहे.
       याबाबत हिंदी स्कूल रामनगरचे मुख्याध्यापक चन्द्रजीत सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीशालेय कार्यालीन कामकाजात सेवाजेष्ठता नियमांचे पालन करीत शिक्षकांना बढत्या दिल्या जातात. सेवापुस्तिका, शेरे पुस्तिकांच्या नोंदी शासननिर्णय नुसार भरल्या जातात. शाळेमध्ये सेवेत असणाऱ्या शिक्षकांना त्यांनी मागणी केल्यास सेवापुस्तिका अवलोकन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.     


                  

तर केडीएमसी प्रशासकीय शिक्षण अधिकारी जे.जे. तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीसंदर्भीत शाळेच्या शिक्षकांच्या तक्रारी बाबत लवकरच सुनावणी घेऊन तक्रारीचे निवारण करणार आहोत. कोकण विभाग शिक्षण सेनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रेठाणे जिल्हा शिक्षकसेना उपाध्यक्ष गोकुळ पाटील यांनी संदर्भीत शाळेच्या शिक्षकांचे तक्रारीचे निवारण न झाल्यास शाळेसमोर आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments