ज्येष्ठ नेते विजय कांबळे यांच्या निधनाने कामगारांचा कैवार घेणारे नेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 29 :  -  आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ  कामगार नेते विजय कांबळे यांच्या निधनाने कामगारांचा कैवार घेणारे नेतृत्व हरपले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत कामगार नेते विजय कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

 

  

खेरवाडी येथे दिवंगत कामगार नेते विजय कांबळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन ना रामदास आठवले यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.             कामगार नेते विजय कांबळे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर दि. 24 सप्टेंबरला रात्री  लीलावती रुग्णालयात जाऊन विजय कांबळे यांच्या प्रकृतीची ना रामदास आठवले यांनी चौकशी केली होती.काल रात्री दि. 28 सप्टेंबर रोजी कामगार नेते विजय कांबळे यांच्या निधनाची अत्यंत दुःखद वार्ता कळताच ना रामदास आठवले यांनी आपले दिल्लीतील कार्यक्रम रद्द करून आज मुंबईत येऊन दिवंगत विजय कांबळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.          दिवंगत विजय कांबळे हे अनेक वर्षे कामगार चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नंतर 2014 मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला.मात्र कामगार चळवळ आणि आंबेडकरी चळवळीचा विचार त्यांनी कधीही सोडला  नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकसाठी त्यांनी समुद्रात एक मूठ माती टाकण्याचे केलेले आंदोलन संस्मरणीय ठरले आहे.          कामगार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिल्याने कामगारांचा  खरा कैवारी अशी प्रतिमा विजय अण्णा कांबळे यांची झाली होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि राज्याच्या कामगार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments