कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागा कडून भाजपा सरकारच्या धोरणांचा निषेध
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. कल्याणमध्ये भारत बंदच्या या हाकेला प्रतिसाद देत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्यावतीने मोर्चा काढत निषेध नोंदविण्यात आला.       केंद्रातील भाजपा सरकारने तीन काळे कायदे लागू केले, त्यात शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. कामगार विरोधी कायदे आणून कामगारांवर अन्याय केला. भारतात तरुण बेरोजगारांची संख्या देखील वाढत असल्याने तरुणांना देखील न्याय दिला नाही. दररोजच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेत्तृत्वाखाली पत्रीपूल येथून मोर्चा काढण्यात आला.            कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चालत येत याठिकाणी महील आणि पुरुष कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा शिफा महशर पावले खटखटे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments