शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मनसेचा ठाम विरोध

 डोंबिवली ( शंकर जाधव ) ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या नियमाला मनसेने ठाम विरोध केला आहे.करोनाची  तिसरी लाट येणार नाही हे सरकारने आधी जाहीर करावे त्यानंतर शाळासंदर्भात आपले मत व्यक्त करावे. त्यामुळे शाळा सुरु कर करण्याच्या निर्णयाला मनसेने ठाम विरोध केला आहे. शाळेत पाल्यांना पाठवणे रिक्स आहे असे पालकवर्गांचे म्हणणे आहे.डोंबिवलीत एका कार्यक्रमात मनसे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सरकारने याची जबाबदारी घ्यावी असे सांगितले.        करोना काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु असल्याने अनेक विद्यार्थ्यांना डोळ्याचा त्रास सुरु झाले आहे.लहान मुलांना या त्रासापासून वाचता यावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार सुरु व्हावे या उद्देशाने मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमाक ५१, ५२ आणि ५६ प्रभागातील १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी डोंबिवली पश्चिमेकडील अमोघ सिद्ध सभागृहात नेत्रतपासणी शिबिर भरविले होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर,डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील, उपशहर अध्यक्ष परेश भोईर, शहर सचिव प्रीतेश म्हामुणकर, संदीप ( रमा ) म्हात्रे,सुमेधा थत्ते यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.           या शिबिरात २०० पेक्षा जास्त मुलांच्या डोळ्याचे तपासणी करण्यात आली.तर ज्या मुलांना चष्मा लागला आहे त्यांना मोफत चष्मे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष भोईर म्हणाले,शालेय विद्यार्थ्यासाठी हे शिबीर भरविले होते. गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे, त्याचा विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर किती परिमाण झाला आहे कि नाही यासाठी शिबीर भरविण्याचा उद्देश होता.पुढे भोईर यांनी शाळा सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. ये पुढे म्हणाले,          राज्य सरकारच्या लाटा थांबणार आहेत का त्यातच ते तरंगत राहतील.          करोनाची तिसरी लाट येणार  आहे कि नाही यावर हे सरकार ठाम आहे का ? एकीकडे घराबाहेर हे सरकार जनतेला पडू देत नाहीत, दुसरीकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेता हा विरोधा भास नाही का ? शाळा सुरु करण्याचा निर्णय हि राज्य सरकारची पळवाटा आहे. करोनाची तिसरी लाट येणार नाही हे सरकारने आधी जाहीर करावे, मग शाळा सुरु कराव्यात.सरकारच्या नाकर्तेपणा लपवण्यासाठी खेळ सुरु आहे.सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे. यावेळी रुपाली फाटक म्हणाल्या, शाळा सुरु करण्याचा निर्णय चुकीचा आहे. करोनाची लाट संपत नाही तोपर्यत शाळा सुरु करणे हि  लहान मुलांसाठी रिक्सच  आहे.

Post a Comment

0 Comments