पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष डोंबिवली शहर खड्यात पडले ...भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांचे वक्तव्य
डोंबिवली , शंकर जाधव  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन रस्त्यातील खड्ड्यांमुळे अधोरेखित होत आहे. नवीन कोपर उड्डाणपुलावरील खड्डेप्रकरण चांगलेच गाजले. आता जुनी डोंबिबली रस्त्याची चाळण झाली असून भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी जुनी डोंबिवली रस्त्यातील खड्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते आहेत अशी विचारणा केली आहे. याबाबत अनेक निवेदने देऊनही अधिकारी लक्ष देत नाहीत असा आरोपही केला आहे.           याबाबत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिबली पश्चिम विभाग मुळात दुर्लक्षित आहे. पश्चिम विभागातील इतर रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. कोपर रोड, दीनदयाळ रोड, गुप्ते रोड चालण्यायोग्य रस्ते असून सुभाष रोड आणि जुनी डोंबिवली रोड अद्याप पन्नासवर्षे पूर्वीचेच आहेत. जुनी डोंबिवली रोडवर प्रत्येक वर्षी फक्त डांबराचे आवरण घालून रस्ता करण्यात आला अशी पुस्ती जोडली जात आहे.
         मुळात रस्त्यातील ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याने आजही दोन्ही बाजूंच्या गटारामधूनच घाण पाणी वाहून जात आहे. गटारांकडे वर्षभर कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे ती मातीने तुंबली जातात आणि पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबते आणि पादचारी करदात्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दररोज नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येत असूनही आम्ही काहीच करू शकत नाही. विशेष म्हणजे या विभागाला महापौर पदे मिळाली असूनही अद्याप हा विभाग विकासकामांपासून वंचित असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
          त्याचबरोबर येथील नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असून सुमारे ५० टक्के नागरिकांना लस मिळाली नाही. पालिका आरोग्य विभागाकडे लसीकरण केंद्रासाठी मागणी केली होती त्याची पूर्तता होत नाही. विभागातील केंद्रावर लस उपलब्धता नसून काही ठराविक केंद्रांना पालिका प्रशासन छुकते माप देत असते. याविषयी तक्रार केली आहे असेही पाटील सांगतात.          तसेच प्रभागातील नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून खड्डे बुजवणे काम करून थोड्या प्रमाणात नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पण ते पुरेसे नसल्याने प्रशासनाने ते काम तातडीने करणे आवश्यक आहे. आमचे गणपतीही खड्ड्यांमधूनच आले आता तरी पालिका प्रशासनाने गणेश विसर्जन पूर्वी खड्डे बुजवून रस्ते चालण्याजोगे करावे असे वाटत आहे.याबाबत पालिका ह प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

0 Comments