गणपती विसर्जनात डोंबिवलीकरांच्या शिस्तीला अभिनेता भूषण कडूने केला सलाम
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाच प्रादुर्भाव वाढू नये आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्य शासनाने निर्बध लागू केले होते.शासनाच्या नियमांचे पालन करत डोंबिवलीत गणपती बाप्पाला निरोप देत भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.डोंबिवलीकरांच्या शिस्तीला सलाम करत प्रसिद्ध मराठी अभिनेता  भूषण कडू याने कौतुक केले.             डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील गणेश घाट येथे अत्यंत शिस्तीने आणि शासनाच्या नियमाचे पालन करूनश्री गणेशच्या मूर्तीचे १० व्या दिवशी विसर्जन करण्यात आले. येथील गणेश घाटावर गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी आणि विसर्जन केल्यानंतर गणेश भक्तांना जाण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती.तसेच संपूर्ण गणेश घाटात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.ऊन-पावसात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शेड लावले आहेत. `आय लव कुंभारखानापाडा` असे लिहिलेल्या .. हे सेल्फी पाॅईट बनले आहेत. गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या मुतीचे विसर्जन करण्यासाठी फक्त दोन जणांना आत सोडले जात होते.
                पुढे मंडळाचे कार्यकर्ते मूर्तींचे पाण्यात विसर्जन करत होते. वाहन पार्किंग साठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली होती. हे सर्व  स्थायी समितीचे माजी सभापती तथा भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू हे या गणेश घाटावर आले असता त्यांनी डोंबिवलीकरांची शिस्त पाहून तोंडभरून कौतुक केले.भूषण कडू म्हणाले, लॉकडाऊन काळात चित्रपट सृष्टीवर आणि नाटक कलाकारांवर अवकळा पसरली होती.    

                आता सर्व पूर्वपदावर आले असून लवकर बाप्पा  आशीर्वादाने सर्वांचे दुख: विसर्जित होतील. मुंबईत गणेश विर्सजनाला जो गोंधळ आणि डीजेचा आवाज एकू येत होता. परंतु डोंबिवलीकर खूपच शिस्तप्रिय असल्याचे दिसले. शासनाच्या नियमाचे पालन करून अत्यंत चांगल्या पद्धतीने श्री गणेशच्या मूर्तीचे विसर्जन करत असल्याचे पहिले. डोंबिवलीकरांच्या या शिस्तीला माझा सलाम.चौकटकुंभारखानापाडा येथील गणेश घाटावर १० दिवसात ९ टन निर्माल्य जमा झाल्याची माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक नवनाथ लांडगे यांनी पत्रकरांना दिली. यासाठी काही स्वयंसेवक पालिका प्रशासनाला मदत करत होते.विशेष म्हणजे गणेशभक्तांनी निर्माल्य तलावात न टाकता पालिकेच्या निर्माल्य जमा केले जात होते त्या ठिकाणी जाऊन दिले. याबाबत माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि पालिका प्रशासनाने भक्तांचे आभार मानले.  

Post a Comment

0 Comments