व्हेंचर कॅटॅलिस्ट्स बनले शार्क टँक इंडिया शोचे 'स्टार्टअप इकोसिस्टम सल्लागार'
मुंबई, २ सप्टेंबर २०२१  : आपल्या भात्यात आणखी एक बाण जोडत, व्हेंचर कॅटॅलिस्ट्स, भारतातील पहिले आणि सर्वात मोठे एकात्मिक स्टार्टअप इनक्यूबेटर आणि एक्सीलरेटर यांनी आज जाहीर केले की, यावर्षी भारतात येणाऱ्या अधिकृत शार्क टँकच्या पहिल्या आवृत्तीसाठी सोनी टीव्ही आणि स्टुडिओनेक्स्टसाठी 'स्टार्टअप इकोसिस्टम डव्हायझर' म्हणून त्याचे नाव देण्यात आले आहे.        शार्क टँक हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध, समीक्षकांनी प्रशंसित आणि बहुविध पुरस्कार विजेता रिलिटी शो आहे. जो इच्छुक उद्योजक आणि स्टार्टअप मालकांना त्यांचे व्यवसाय मॉडेल गुंतवणूकदारांसमोर उभे करतो आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी कल्पनांवर काम करुन टेलिव्हिजनच्या माध्यमातून लाखो घरांमध्ये पोहोचतो.     व्हेंचर कॅटॅलिस्ट्सचे सहसंस्थापक श्री अनुज गोलेचा म्हणाले, "शार्क टँकने अनेक माहिती नसलेल्या स्टार्टअप्सला जगभरातील कोट्यवधी डॉलर्सच्या व्यवसायांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम केले आहे आणि स्टार्टअप्सच्या भारतीय आवृत्तीमुळे स्थानिक पातळीवर आपला व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या घरगुती स्टार्टअप्ससाठी अमर्याद संधी उपलब्ध होतील. स्टुडिओनेक्स्ट आणि सोनी टीव्हीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण आम्ही स्टार्टअप इकोसिस्टम सल्लागार म्हणून आमची भूमिका बजावण्यास उत्सुक आहोत.       मोठी आव्हाने पेलताना स्टार्टअप्सची पुढील पिढी शोधण्यासाठी भारतातील उद्योजक परिघात आमच्या कौशल्याचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत. हे धोरण भारताच्या स्टार्टअप जगताच्या, विशेषत: महानगरांच्या बाहेर च्या वाढीस हातभार देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे."

Post a Comment

0 Comments