पत्रिपुलाच्या तिसऱ्या लेनच्या कामामुळे मुख्य नाला झाला बंद


■सामाजिक कार्यकर्त्यांने लक्ष वेधताच दोन तासात नाला केला सुरू....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाच्या तिसऱ्या लेनचे काम जलद गतिने  सुरु असून या पुलाचा  पाया बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू झाले आहे मात्र खोदकाम केलेली माती ही पत्रीपुला खालील कल्याण पूर्वेतील मुख्य नाल्यात भरल्यामुळे हा नाला पूर्णपणे बंद झाला. यामुळे कल्याण पूर्वेतील नाल्यांचे पाणी पुढे खाडीला न मिळता  गटारी व छोट्या छोट्या नाल्याच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या घरात येण्यास सुरू झाले. ही बाब  स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांच्या लक्षात येताच त्यांनी  एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना तातडीने नाल्याची माती काढून नाला सुरु करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. खान यांच्या इशार्यानंतर लगेचच एमएसआरडीसीच्या  अधिकाऱ्यांनी  अवघ्या दोन तासात नाल्यातील माती काढून हा नाला सुरू केला मात्र वेळे वर नाल्यातील माती काढली नसती तर येथील आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असती व लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.दरम्यान यापुढे एमएसआरडीसीने या कामावर २४ तास लक्ष देण्यासाठी एखादा अधिकारी अथवा  टेक्निकल इंजिनिअर नेमावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments